फुले,शाहू आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्ता हरपला

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.27सप्टेंबर):-आसू, ता.फलटण,जि. सातारा येथील किशोर खरात (जिल्हा उपाध्यक्ष BVM सातारा) यांचे आजोबा फलटण, बारामती तालुक्यातील केळीचे प्रसिद्ध व्यापारी,शिव, फुले, शाहू, आंबेडकर चळवळीचे काम करणारे सामाजिक कार्यकर्ते भीमराव दिनकर पवार यांचे अल्पशा आजाराने महापरिनिर्वाण झाले.

ते सत्यशोधक वारकरी संप्रदायात काम करत होते त्यांच्या परिवारात 17 लोकांचा परिवार असून ते कोणत्याही एका पक्षाला मानत नव्हते तर ते विचार धारेला मानत होते त्यांना एकूण 3 अपत्य एक भाऊ,मुलगा सध्या पीपल्स education सोसायटी मध्ये लेक्चरर आहे,आणि त्यांचे लहान भाऊ कराड ITI कॉलेज चे प्राध्यापक असून या सर्वाना त्यांनी अत्यन्त गरिबीतून आणि कष्ट करून शिकवले.

समाजामध्ये त्यांची केळीवाले बुवा अशी ओळख होती.अत्यंत सज्जन व्यक्तिमत्व म्हणून त्याची परिसरामध्ये ओळख होती.कालकथीत भिमराव दिनकर पवार यांना भारतीय विद्यार्थी मोर्चा आणि सर्व ऑफशुट विंगच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.तसेच सामाजिक,राजकीय क्षेत्रातूनही त्यांना आदरांजली वाहण्यात आली.त्यच्या जाण्याने आसू गावात आणि परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED