आष्टीत खा.रंजनीताई पाटील यांच्या निवडीचे फटाके फोडून स्वागत

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.3जम्मू काश्मीरच्या काँग्रेस पक्षाच्या प्रभारी खा.रंजनीताई पाटील यांची खा.राजीव सातव यांचे निधन झाल्यानंतर या रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी व खा.राहूल गांधी यांच्या आदेशावरून राज्यसभेवर निवड करून सोमवार दि.२७ सप्टेंबर रोजी एकमेंव अर्ज राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याने आष्टी शहरातील शिवाजी चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी विधानसभा अध्यक्ष रविंद्र ढोबळे यांच्या नेतृत्वाखाली फटाके फोडून आनंद उत्सव व जल्लोष साजरा करण्यात आला.

यावेळी विधानसभा अध्यक्ष रविंद्र ढोबळे,युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नानासाहेब आजबे,अँड शार्दूल जोशी,अँड डि.एस.ससाणे,डाॅ.राजेंद्र जरागे,सतिश मुरकुटे,गणीभाई तांबोळी,अख्तर शेख,हारूण शेख,वसंत चव्हाण,काकासाहेब कर्डीले,गणेश भालेराव आदी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED