शेतकऱ्यांच्या देगलूर बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद

28

✒️तालूका प्रतिनिधी(महादेव उप्पे)

देगलूर(दि.२७सप्टेंबर):- दिल्ली येथे मागील नऊ महिन्यापासून चालू असलेल्या संयुक्त किसान मोर्चा व विविध शेतकरी संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदला देगलूर तालुक्यातील विविध संघटनेचे कार्यकर्ते व शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरत बंद उत्स्फुर्तपणे यशस्वी केला.

देगलूर येथील आण्णाभाऊ साठे चौक ते डाँ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, सराफा लाईन, महात्मा बसवेश्वर चौक तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून, जुना बस स्टँड ते उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारत शेतकरी व तरूणांनी शेतकरी एकजूटीचा विजय असो, शेतकरी विरोधी आयात धोरण रद्द करा, काळे कायदे मागे घ्या अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकले. शेतकऱ्यांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी नायब तहसीलदारांना देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने शेतकरी विरोधी तीनही कायदे रद्द करा, सोयाबीन आयात धोरण रद्द करून शेतमालाला योग्य भाव द्या, अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर हेक्टरी चाळीस हजार रूपये आर्थिक मदत व सरसकट पीकविमा मंजूर करा या व इतर मागण्या मांडण्यात आल्या.

यावेळी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव चुकाबुटले, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रमुख श्याम पाटील कुशावाडीकर, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख कैलास येसगे कावळगावकर, शेतकरी सुधाकर पाटील भोकसखेडकर, शेकापचे तालुका अध्यक्ष खय्युम शेख, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष राजू पाटील, तालुका प्रमुख जेजेराव पाटील शिंदे, छात्रवीर संघटनेचे नारायण पाटील वडजे, भरत पाटील, मराठा महासंघाचे तालुका प्रमुख ईश्वर देशमुख, कृषी परिषदेचे नारायण हिंगोले, काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे खालिद पटेल, डाँ. मिलींद शिकारे, राष्ट्रवादीचे शंशाक पाटील मुजळगेकर, बालाजी पाटील, वंचितचे ज्ञानेश्वर चिंतले, प्रहारचे दिपक रेड्डी, शहाजी पाटील बाबरे, दिलीप पाटील सुंडगीकर, वैभव पाटील, गंगाधर आऊलवार, मारोती पाशमवार, शेतकरी विजय पाटील, अच्युत पाटील, शंकर रायकोडे, सूरज पाटील, पांडूरंग भुयारे, बजरंग बिरादार, सुधाकर जबडे, चाँद देगावकर, बाबाराव कदम, दिगंबर कदम व शेतकरी तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते.