बीड जि.प.चे माजी उपाध्यक्ष सर्वसामान्यांचे “भाऊ” बाबासाहेब पाटील यांचे निधन

31

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

बीड(दि.27सप्टेंबर):- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील कडेकर (वय ८२) यांचं वृद्धापकाळाने रविवार दि.२५ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वा.त्यांच्या कडा येथील राहत्या घरी निधन झाले.बाबासाहेब दत्ताजी पाटील हे आष्टी तालुक्यामध्ये “भाऊ” नावाने परिचित असे व्यक्तिमत्त्व होते.त्यांनी सलग आठ वर्ष बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून कारभार पाहिला होता.काही दिवस त्यांनी बीड जि.प.चे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते.

जिल्हा परिषद बांधकाम आणि पशुसंवर्धन,
शिक्षण या विभागाचे सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिले.कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते संस्थापक सभापती होते.त्यांच्यापाठीमागेॲड.नागेश आणि आष्टी पंचायत समितीचे माजी सदस्य बाप्पासाहेब पाटील हे दोन मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्यावर कडा येथील स्मशानभूमीत सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या निधनामुळे कडा गावावर शोककळा पसरली आहे.

बाबासाहेब पाटील यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आ.बाळासाहेब आजबे,आ.सुरेश धस,माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर,परमेश्वर शेळके काका,उध्दव दरेकर,आण्णासाहेब चौधरी,ॲड.हनुमंत थोरवे,ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल,ह.भ.प.निवृत्तीदादा बोडखे महाराज,डाॕ.शिवाजी शेंडगे,बलभिमराव सुंबरे,अशोक साळवे,रमजान तांबोळी,संपतदादा सांगळे,संजयनाना ढोबळे,प्राचार्य डाॕ.हरिदास विधाते,पत्रकार उत्तम बोडखे,अण्णासाहेब नाथ आदि सामाजिक,राजकीय,धार्मिक क्षेत्रातील मान्यवर यांच्यासह कडा पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.