ग्रामपंचायत सदस्य यांच्या खोट्या स्वाक्षरी करणारे ग्रामसेवक व सरपंच यांच्या विरुद्ध केली तक्रार

31

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी )

गंगाखेड(दि.28सप्टेंबर):- तालुक्यातील दुसलगाव ग्रामपंचायत मध्ये येथील ग्रामसेवक व सरपंच यांचा मनमानी कारभार करत असून दुसलगाव ग्रामपंचायत मध्ये होणारी मासिक बैठक ची स्वाक्षरी घेतली जात नसून दुसलगाव ग्रामपंचायत सदस्यांची एकूण संख्या सात आहे. या पैकीं चार सदस्यांनी ग्रामसेवक व सरपंच यांचा मनमानी करभार विरुद्ध दुसलगाव ग्रामपंचायत सदस्यांनी तक्रार करून असे म्हणणे मांडले आहे की 11फेबूरवारी 2021रोजी सरपंच व उपसरपंच यांच्या निवडीच्या प्रक्रियासाठी आम्हास नोटीस मिळाली होती. सरपंच व उपसरपंच यांच्या निवडीच्या प्रक्रियासाठी आमी सदस्य हजर होतोत. परंतु या नंतर मात्र आम्हाला एकही नोटीस मिळाली नसून आम्हा सदस्या विरुद्ध जाणीव पूर्वक षडयंत्र करून आमचे सदस्य पद घालवण्याचे कट रचला जात असण्याची शक्यता नाकरता येत नाही.

परंतु ग्रामपंचायतची मासिक बैठक घेत नसल्याने हा लोकशाहीचा आघात च मानावे लागतील असी खंत सदस्यांनी मांडली असून दुसलगाव येथील ग्रामसेवक हे अनेक वर्षा पासून याच दुसलगाव ग्रामपंचायत चा कारभार पाहत असल्या मुळे येथील ग्रामस्थांच्या समस्याना नजर अंदाज केला जात असून ग्रामसेवक व सरपंच यांनी विकासाचे एक ही काम नकरता स्वार्थपाही गावातील कुठलेही विकासाचे काम करण्यात आले नाही. तसेच आम्हा सदस्यांना ग्रामपंचायतच्या कामकाजा विषयी विश्वासात घेतले जात नसून ग्रामसेवक व सरपंच हे ग्रामपंचायत सदस्या यांच्या परस्पर ठराव रजिस्टर, मासिक बैठकीचे रजिस्टर, व प्रोसेडींग बुकावर आमच्या नकली स्वाक्षरी करून मनमानी कारभार करत आहेत.

या मुळे गावाचा विकास होत नसून या प्रकरणी सखोल चौकशी करून ग्रामसेवक व सरपंच यांच्याविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करून दुसलगाव ग्रामपंचायत कार्यलयाचे सूचना पुस्तिका, ठराव पुस्तिका,तात्काळ जप्त करून कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी आशी तक्रार दुसलगाव ग्रामपंचायत चे सदस्य भगवान वैजनाथ मात्रे, भुजंग आत्तम पारवे,गणेश श्रीनिवास कचरे, व सरिता सुनील सोळंके यांच्या स्वाक्षरीने पंचायत समिती गंगाखेड तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांच्या कडे दाखल केली आहे.