प्रहार ने दिला नागभीड नगरपरिषद ला आंदोलनाचा इशारा
✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभीड (दि.28 सप्टेंबर):-येत्या 7 दिवसाच्या अंदर प्रहार जनशक्ती पक्षाच्या मागण्या पूर्ण न केल्यास 5/10/2021 रोजी प्रहार जनशक्ती पक्ष नागभीड नगर परिषद समोर नागभीड येथे सर्व नागरिकांना घेऊन उपोषणाला बसणार याची नगरपरिषद नगराध्यक्ष आणि मुख्य अधिकारी यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

नागभीड नगर परिषद प्रहारच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे नागभीड नगर परिषदला दिला इशारा आहे.यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व प्रहार सेवक नागभीड नगर परिषद उमाजी हिरे सर यांना केबिन मध्ये एक ते दोन तास चर्चा करून नागभीड नगरपरिषदला कळविले.

नागभीड नगरपरिषद ने या सर्व मागण्यांकडे लक्ष देऊन प्रहार जनशक्ती पक्षाकडे 7 दिवसाच्या कालावधीत सर्व समस्या आणि मागण्या मंजूर करण्यात यावे,असे पत्रात नमूद केले आहे.यावेळी उपस्थित प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रहार सेवक वृषभ खापर्डे, शेखर फटिंग, निलेश डोमळे, विकी भाऊ फुलवाणी, सौ.अनुसयाबाई रामटेके, दीपक माणूसमारे, राहुल दाडमल, रोहित कुमरे, अक्षय खोब्रागडे, रोहित चौधरी, निखिल मेश्राम, वैभव लांडेकर, संतोष जिवतोडे, आकाश चौधरी आणिअन्य प्रहार सेवक उपस्थित होते
महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED