युवक काँग्रेसचे ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष सोनु नाकतोडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.28सप्टेंबर):-युवक काँग्रेसचे ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष तथा उदापुर ग्रामपंचायतीचे सरपंच प्रभाकर उर्फ सोनु नाकतोडे यांच्या वाढदिवसानिमित्त २८ सप्टेंबर रोजी मंगळवारी सकाळी 11 वाजता ब्रम्हपुरी येथील तालुका काँग्रेस कमेटीच्या कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

कोरोना काळात अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासत होती. त्यामुळे राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा तयार झालेला होता. सोबतच विविध आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांना अनेकदा रक्ताची गरज भासत असते. तेव्हा रक्त उपलब्ध होत नाही. म्हणून रक्तदानाची चळवळ मोठ्या प्रमाणात रुजावी यासाठी आता ब्रम्हपुरी तालुका युवक काँग्रेसने पुढाकार घेतला असुन ब्रम्हपुरी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष सोनू नाकतोडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर राबविण्यात येत आहे.

सदर शिबीरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे.सदर शीबीराला ब्रम्हपुरी तालुक्यातील काँग्रेस कमेटी/महिला काँग्रेस कमेटी/युवक काँग्रेस कमेटी/एन.एस.यु.आय. व काँग्रेसच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED