महाराष्ट्रीयन गुणी अभीनेत्री आष्टीची सुकन्या भाग्यश्री मोटे

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.28सप्टेंबर):-मराठी चित्रपट,मराठी मालिका,हिंदी मालिका,हिंदी चित्रपट सृष्टी किंवा दाक्षिणात्य चित्रपट सृष्टी असो या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला अभिनयाचा ठसा उमटवणारी मराठी अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री मोटे.भाग्यश्री मूळची पुण्याची असून २७ सप्टेंबर १९९४ रोजी श्री.बिभीषण मोटे आणि सौ.पंचशीला मोटे या दांपत्याच्या पोटी तिचा जन्म झाला.भाग्यश्रीने बालपणापासूनच आपल्या कलेचे रंग दाखवायला सुरुवात केली होती.मुंबईमधील ‘दालमिया लायन्स कॉलेज’ मधून मास मिडिया विषयामध्ये पदवी संपादित केली आणि त्यानंतर ठरवलं आपलं मन रमवायचे.अभिनयात तिला बालपणापासूनच खूप आवड होती.कारण भाग्यश्री मोटे हिला पहिली संधी मिळाली वयाच्या १८ वर्षी.महाविद्यालयीनस्तरावर तिने ‘विश्व गर्जना’ या व्यावसायिक नाटकात काम केले होते.

त्यानंतर २०१२ साली स्टार प्रवाह वर प्रसारित झालेल्या देवयानी मालिकेत देखील तिने काम केले.त्यानंतर तिने मराठी चित्रपट सृष्टीत पाय ठेवला आणि शोधू कुठे रे या मराठी चित्रपटात तिने काम केले.त्यानंतर तिला एकामागोमाग चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या ‘पाटील’, ‘काय रे रास्कला’, ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ अशा चित्रपटांमध्ये भाग्यश्री झळकली आहे.तिने त्यानंतर २०२७ मध्ये अभिनेता ललित प्रभाकर सोबत झी युवा वरील ‘प्रेम हे’ या मालिकेत सुद्धा काम केले.मराठी सोबतच तिने हिंदी मालिकांमध्ये देखील आपल्या अभिनयाचे कसब दाखवून दिले.ती हिंदीतील काही पौराणिक मालिकांमध्ये झळकली आहे जसे कि ‘जोधा अकबर’, ‘देवो के देव महादेव’, आणि ‘सिया के राम’.बिग बॅनरद्वारे प्रदर्शित होणारा ‘काय रे रास्कला’ या चित्रपटात तिने काम केले.

या चित्रपटाची निर्मिती प्रियंका चोप्राने केली होती.प्रियंकाचे मराठी चित्रपटात निर्माती म्हणून हा दुसरा चित्रपट होता.याआधी तिने ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटात निर्माती म्हणून काम केले होते.भाग्यश्रीने तेलुगू चित्रपटसृष्टीत Chikati Gadilo Chithakotudu या चित्रपटातून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण केले.यात तिने आपला मादक अंदाज प्रेक्षकांना दाखवला होता.भाग्यश्री लवकरच बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण करणार आहे.ट्रायंगल प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘हृदय गुजर’ करणार आहे.हा चित्रपट पुढच्या वर्षी रसिकांच्या भेटीला येणार आहे.
———————————————-
कौटुंबिक माहिती –
वडील – बिभीषण मोटे,आई – पंचशीला मोटे.उंची – ५’५”वजन ६० किलो,केसांचा रंग – काळा आणि तपकिरी.भाग्यश्री मोटे बद्दल अधिक माहिती वैयक्तिक माहिती – नाव – भाग्यश्री मोटे,जन्मतारीख -२७ सप्टेंबर १९९४,जन्म ठिकाण – पुणे TOT – Annasaheb Magar Vidyalaya, Pimple Saudagar कॉलेज – Dalmia Lions, Malad,शिक्षण – Mass Media आवडत्या गोष्टी (Favourite Things), छंद – गाणी ऐकणे,आवडता अभिनेता – अल पचिनो,ह्यू ग्रॅण्ट,आवडती अभिनेत्री – मोनिका बेलुकी,आवडता रंग – जांभळा,आवडता पदार्थ – मोघलाई,आवडता खेळ – टेनिस.भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते.भाग्यश्री मोटे Instagram वर आपले फोटो शेअर करत असते.तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही वेड लावणारा आहे.लॉकडाऊनच्या काळात तिचा रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी तिने आपल्या फोटोच्या माध्यमातून प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे.भाग्यश्री मोटेला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…!!!
– उत्तम बोडखे,वरिष्ठ पत्रकार,आष्टी,जि.बीड (मो.९४२३४७१४९०)

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक
©️ALL RIGHT RESERVED