वारसाला डावलून जमीन पत्नीच्या नावावर करणारा तलाठी अखेर केला निलंबित

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.28सप्टेंबर):- येवला तालुक्यातील तलाठी अतुल शंकर धूल यांनी वारसाला डावलून जमीन आपल्या पतीच्या नावावर केल्यानंतर आता प्रांताधिकारी यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे गेल्या महिन्यात तालुक्यातील हडप सावरगाव येथे हा प्रकार समोर आला होता या तलाठी ने हडप सावरगाव गट नंबर 57/3 मधील 8 एकर शेत जमीन मूळ वारसांना डावलून नोंदीमध्ये फेरफार करून आपल्या बायकोच्या नावावर करून घेतली.

हा सर्व प्रकार मूळ वारस दिव्यांग असलेला मंदा पवार राहणार बाबळेश्वर यांनी आपल्या मातुलठाण तालुका येवला येथील आपल्या गावी आल्यानंतर लक्षात आला त्यानंतर त्यांनी तक्रार केल्यानंतर चौकशी करून ही कारवाई करण्यात आली या चौकशीत आणि या चौकशीत गैरप्रकारही समोर आले आहे त्यामुळे शासकीय कामात अनियमितता केली म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे निलंबनाचे आदेशाची सर्व कारणे खाली दिली आहे

महाराष्ट्र
©️ALL RIGHT RESERVED