एकनिष्ठा कडून गौ-मातेसह जख्मी माकडावर उपचार

31

✒️मनोज नगरनाईक(विशेष प्रतिनिधी)

खामगांव(दि.28सप्टेंबर):-गौ-सेवेत सदा अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा गौ-सेवा फाऊंडेशन कडून 4 गौ-वर तर अपघातात गंभीर जख्मी झालेल्या माकडावर उपचार करण्यात आले. शेगांव रोड जयपुर लांडे फाटा स्थित एका अज्ञात वाहनाने माकडाला जबर धडक दिल्यामुळे ते माकड जमिनीवर गंभीर अवस्थेत पडलेले होते घटनेची माहिती मिळताच डॉ कडून उपचार करून माकडाला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. तसेच लक्कडगंज स्थित एक नवजात बेवारस वासरूवर मौकाट कुत्र्यांनी हल्ला केलता एकनिष्ठा गौ-सेवकांनी वासरूचे प्राण कुत्र्यापासून वाचविले व गौ-मालक शेरू चौधरी याचा शोध घेऊन दुसऱ्या दिवशी वासरू त्याच्या स्वाधीन केले.

स्वामी समर्थ केंद्र नांदुरा रोड स्थित एका गौ-ला विषबाधा जास्त प्रमाणात झाली होती ति भर पावसात जमिनीवर तड़फड़त होती घटनेची माहिती मिळताच तिच्यावर डॉ बोलावून उपचार करण्यात आले परंतु ती गौ गतप्राण झाली. सिटी पोलिस स्टेशन स्थित एका बेवारस वासरूचे लचके मौकाट कुत्र्यांनी तोडलेले होते घटनेची माहिती मिळताच वासरूवर उपचार करण्यात आले. तलावरोड स्थित एक सिंग तुटलेली गौ-जख्मी अवस्थेत फिरत होती तिच्या सिंगा मधून खुप दुर्गंध येत होता आणि जख्म खोल असल्याने खुप अळया पडल्या होत्या तिच्यावर उपचार करण्यात आले.

या सेवेत सुरजभैय्या यादव, डॉ. दत्तात्रय मामनकार, जितेंद्र मच्छरे, विक्की सारवान, सनी ससाने, अभय अग्रवाल, विजय ठाकुर, राजेश पुरोहीत, शुभम शमी, प्रवीण सोलंके, मंगेश चव्हाण, मोनू मेहरा, यादवसिंग बोराडे, त्रिशूल ठाकरे, बबलू जाधव, सुशांत देशमुख, नीरज गुजर, अविनाश मोरे, शरद पुरोहीत,भुपेश राजपूत, रोशन लोखंडे, गोलू इंगले, अनिकेत लोखंडे, शेख अनवर, वनविभाग कर्मचारी मिलिंद इंगले या गौसेवेला संपूर्ण लागणारा खर्च गौ-सेवकांनी केला. अशी माहिती विजय ठाकुर यांनी दिली.*