कुंडलवाडी येथे नपाच्या वतीने जेष्ठ नागरीकांसाठी आसनची व्यवस्था….

29

✒️अशोक हाके(बिलोली,ता.प्र.)मो.न.9970631332

बिलोली(दि.28सप्टेंबर):- तालुक्यातील कुंडलवाडी
येथील नगरपालिकेच्या वतिने थोडासा मायबाप या उपक्रमाअंतर्गत सेवानिवृत्त व जेष्ठ नागरीकांसाठी नविन ईमारतीच्या दुस-या मजल्यावर आसनाची व्यवस्था करण्यात आली.याचे उदघाटन नपाचे अध्यक्षा सुरेखा जिठ्ठावार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मुख्यधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे,नरेंद्र जिठ्ठावार,मंजूषा दाचावार यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.

थोडासा मायबाप या कार्यक्रमासाठी शहरातील जेष्ठ नागरीकांचा नपाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी गंगाधर जायेवार,गोदावरी पेंटावार,मोहनाजी कोटलावार,लक्ष्मण गांजरे,नागनाथ जायेवार,गंगाधर पेंटावार आदी नागरीकांचा सत्कार करण्यात आला.हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष निरावार,शंकर जायेवार,मारोती करपे,मुंजाजी रेनगडे,गंगाधर पत्की,धोंडीबा वाघमारे,शुभम ढीलोड,मोहन कंपाळे,निर्मला वाघमारे यांनी परीश्रम घेतले