शेतकऱ्यांचे केलेले कष्ट रानटी डुकराला दान….

🔹रानटी डुकराला उपद्रव प्राणी म्हणून घोषित करा- शेतकऱ्यांची मागणी

✒️भास्कर फरकडे(चामोर्शीतालूका प्रतीनिधी)मो:-9404071883

चामोर्शी(दि.28सप्टेंबर):- तालुक्यातील आष्टी परिसरात कापूस. धान. सोयाबीनसह ईतर पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते पण आष्टी परिसर हे जंगल व्याप्त असल्याने या घनदाट जंगलात बिबट. हरीण.चितळ. रानडुकर यासारखे अशे अनेक प्राण्यांचा वावर आहे आता कापूस पिकाला बोंडे लागले आहेत व हलक्या जातीचे धान पूर्ण निस्वा झाला आहे पण रानटी डुक्कर धुमाकूळ घातल्याने आष्टी परिसरातील शेतकऱ्यांचे रानटी डुकरे मोठया प्रमाणात नुकसान करीत आहेत.

शेतकरी वनविभागाकडे तक्रार करून नुकसान भरपाईची मागणी करीत आहे परंतु वनविभागाकडून चौकशी होऊन नुकसान भरपाई मिळे पर्यंत हाती आलेला पिक डुकराला दान करण्याची वेळ आष्टी परिसरातील शेतकऱ्यावर आली आहे करिता आष्टी परिसरातील शेतकऱ्यांनी वनविभागाने रानटी डुकराला उपद्रवी प्राणी म्हणून घोषित करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED