सामान्य जनतेचा खराखुरा विघ्नहर्ता पोलिस

21

देशात सामान्य जनतेच्या संकटकाळात कोणताच देव धावून येत नाही हे सामान्य जनतेने वेळोवेळी अनुभवले आहे. सामान्य जनतेच्या संकट काळात धावून येणारा खराखुरा विघ्नहर्ता पोलिस आहे. ३६५ दिवस आणि विशेषतः सण उत्सव असल्यास पोलिसांवर अधिक जबाबदारी वाढत असते, किती ही जबाबदारी वाढली तरी ती जबाबदारी हसतमुख राहत सदैव जनतेच्या आनंदमयी वातावरण निर्मिती साठी सज्ज असलेला आपला माणुस पोलिस सदैव सामान्य नागरिकांसाठी स्वतःच्या कुटुंबा पासून दूर राहून जनतेला जपत असतो. नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवा दरम्यान घरातली सुखदुःख विसरून सामान्य जनतेचा आनंदउत्सव पार पडावा यासाठी अहो रात्री पोलिस प्रशासन कर्तव्य बजावत होते.

सामान्य जनतेचा खराखुरा विघ्नहर्ता हा आपल्यासाठी पोलिसच आहेत म्हणून आम्ही सर्व पी उत्तर विभागातील सर्व सामाजिक बांधिलकी असणाऱ्या फेडरेशन, बचत गट, मंडळ, सामाजिक कार्यकर्ते सर्वांनी मिळून स्वतःच्या हाताने ११०० चाँकलेट मोदक बनवून आपला विघ्नहर्ता मालवणी पोलिस ठाणे आणि अधिकारी वर्ग वरिष्ठ पोलिस निरिक्षक श्री.शेखर भालेराव, निर्भया पथक प्रमुख थोरात मॅडम यांना सुपूर्द केले.या भेटी दरम्यान पोलिस वर्ग, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, निर्भया पथक प्रमुख यांनी आम्हास मोलाचे मार्गदर्शन केले तसेच सदैव सामजिक कार्यास सहकार्य लाभेल असे आश्वासन दिले.

यावेळी फातीमा कूरेशी सचिव- लक्ष्यद्धिप फेडरेशन,बचतगट अध्यक्ष – सत्यशोधक महिला कामगार संघटना मुंबई प्रदेश,हेमलता काटे,ज्योती देशमुख, माया बरवा, ऋतुजा गुजर,आनंद कांबळे सह सर्व बचतगट प्रमुख उपस्थितीत होते,पोलीस अधिकारी वर्गांना मोदक देऊन गणपती बाप्पा मोरया,म्हणून सर्वांचे आभार व्यक्त केले.

✒️फातीमा कूरेशी(सचिव- लक्ष्यद्धिप बचतगट फेडरेशन तथा अध्यक्ष – सत्यशोधक महिला कामगार संघटना मुंबई प्रदेश)भ्रमणध्वनी ८८७९२७६६९२