कोरोना बरोबरच डेंगू,मलेरिया आजारा बाबतही अधिकारी व नागरिकांनी सतर्क राहावे – आ.बाळासाहेब आजबे

27

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.29सप्टेंबर):-कोरोना काळात तालुक्यातील जनतेने प्रशासनाला चांगले सहकार्य केले आहे.परंतु,कोरोनाअजूनही संपलेला नाही तर डेंगू व मलेरिया सारख्या साथ आजारांनीही डोके वर काढले आहे.त्यामुळे अधिका-यांनी व नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.संपूर्ण तालुक्यात सध्या डेगू,मलेरीयाची साथ सुरू झाली असून यासाठी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये हायफ्लोराईड फवारणी करून रोगराईला आळा घालण्याचे काम करावे अशा सुचना आ.बाळासाहेब आजबे यांनी बोलताना दिल्या आहेत.

आष्टी येथील तहसिल कार्यालयात आ.बाळासाहेब आजबे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि.२६ रोजी दुपारी साडेबारा वाजता तालुक्यातील विभाग प्रमुख अधिका-यांची आढावा बैठक घेण्यात आली.याप्रसंगी माजी आ.साहेबराव दरेकर,तहसिलदार राजाभाऊ कदम,नायब तहसिलदार प्रदिप पांडूळे,नायब तहसिलदार निलीमा थेऊरकर,गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे,तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.जयश्री शिंदे,ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.राहूल टेकाडे,पोलिस उपनिरीक्षक योगेश कोरडे,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आण्णासाहेब चौधरी,काकासाहेब शिंदे,नगर पंचायतचे कार्यालयीन प्रमुख गिते यांच्यासह आदि अधिकारी उपस्थित होते.पुढे बोलतांना आ.आजबे म्हणाले,सध्या कोरोना रूग्णांची संख्या जरी कमी झाली असली तरी नागरीकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.तसेच तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतला सुचना देऊन गावात हायफ्लोराईड फवारणी करावी.कारण सध्या कोरोनापेक्षा डेंगू,मलेरीया ह्या साथ रोगाचे प्रमाण वाढले आहे.यातूनच कोरोनाची लागण होते.तसेच तालुक्यातील यावर्षी निसर्गाने चांगली साथ दिल्याने जवळपास सर्वच तलाव ओहरफ्लो झाले आहेत.

त्यामुळे यावर्षी विद्युत अडचणी शेतक-यांना येता कामा नये,सर्व नादुरूस्ती लाईन दुरूस्त करावी तसेच विद्युत ग्राहकांनीही आपली थकीत विजबिले भरून नादुरूस्त डिपी दुरूस्त करून घ्यावी.यासह कृृृृषी,महसूल,सार्वजनिक बांधकाम,आरोग्य,नगर पंचायत,पाणी पुरवठा यासह सर्व कार्यालयांचा आढावा आ.बाळासाहेब आजबे यांनी घेतला व सर्वसामान्य जनतेची कामे खोळंबून ठेवू नका अशा सूचनाही यावेळी बोलताना आ.बाळासाहेब आजबे यांनी दिल्या आहेत