क्रांतिकारक भगत सिंग यांची जयंयी मोठ्या उत्साहात साजरी

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.29सप्टेंबर):- मानवाधिकार सेवा संस्थान शाखा कोरपना च्या वतीने क्रांतिकारक भगत सिंग यांची जयंती गडचांदूर नगरीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात भगत सिंग यांच्या प्रतिमेचे पूजन माल्याअर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती जिल्हामध्यवर्ती बँक शाखा गडचांदूर चे शाखा व्यवस्थापक भाऊराव जोगी, प्रशांत बलकी, सुभाष एकरे विलास कुळे सर, ओमप्रकाश एकरे, शैलेंश विरुटकर, पोलीस बांधव व आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी प्रविण काकडे ता. सचिव मानवाधिकार सेवा संस्थान कोरपना यांनी क्रांतिकारक भगत सिंग यांच्या जीवनावर प्रकाश टाकत म्हटले की, भारताला स्वातंत्र्य मिळावे या साठी हसत हसत फासावर जाणारे कमी वयाचे एकमेव क्रांतिकारक म्हणजे भगत सिंग,”कर चले हम फिदा जाण ओ तन साथीयो’ अब तुम्हारे हवाले वतन साथियो”या काव्यातून खूप मोठी जबाबदारी भारतवासीयांवर सोपवली.

भगत सिंग एक अभ्यासुव्यक्तिमत्व समस्त भारतीयांचे आदर्श होते कार्यक्रमास मानवाधिकार सेवा संस्थान चे तालुका अध्यक्ष सतिश बिडकर, सुनील अर्किलवार, पंकज माणूसमारे, अरविंद वाघमारे, प्रवीण मेश्राम. कपिल डाखरे, विजय शेट्टी.मारोती जुमनाके व अन्य सदस्य गण उपस्थित होते तर आभार प्रदर्शन सतीश बिडकर यांनी केलं

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED