गेवराई, तलवाडा बस सेवा पूर्ववत सुरु करा. तलवाडा ग्रामपंचायतचे परिवहन मंडळास निवेदन

26

✒️तलवाडा प्रतिनिधि(शेख आतिख)

तलवाडा(दि.29सप्टेंबर):-गेल्या दोन वर्षा पासुन बागपिंपळगाव ते तलवाडा मार्गे डांबरी रस्त्याचे काम सुरु आसल्याने परिवहन महामंडळाची बस सेवा सर्कलचे मोठे ठिकाण आसलेल्या तलवाडा पुर्णत बंद करण्यात आलेली आसल्यामुळे तलवाडा व या सर्कल मधील आणेक वयोवृद्ध नागरिकांची व विशेष करुन तालुक्याच्या ठिकाणी जाणा-या रुग्णांनची मोठ्या प्रमाणात परवड होत असल्याने तलवाडा ग्रामपंचायतचे ऊप सरपंच आक्रम सौदागर (आज्जुभाई ) व तलवाडा गावचे महिला सरपंच मिनाताई हात्ते यांचे प्रतिनिधि म्हणून विष्णु तात्या हात्ते यांच्या ही बाब लक्षात आल्याने गेवराई परिवहन आगार प्रमुख प्रमुखाास तलवाडा ग्रामपंचायतच्या वतीने निवेदन देऊन गेवराई तलवाडा बस सेवा पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली

असुन निवेदनात आक्रम सौदागर यांनी म्हण्टले आहे की बागपिंपळगाव ते तलवाड्या पर्यंत डांबरी रस्त्याचे काम हे पुर्ण झाले आसल्याने परिवहन विभागा कडुन बंद आसलेल्या बसेस पूर्ववत सुरु करण्यात याव्यात. कारण खाजगी वाहन धारक प्रवाशी व रुग्णांनची आडवणुक करुन जास्तीचे पैसे घेत आसल्याने या भागातील नागरिकांची परवड होत आहे. तसेच राहेरी, भोगलगाव, बोरगावथडी, गंगावाडी, पांढरी, राजापुर, राजुरी मळा, चव्हाणवाडी, देवीतांड्या सह पोईतांडा, आनंदवाडी, किनगाव या गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात तालुक्याच्या ठिकाणी विविध कामासाठी जातात विशेष करुन सध्या या भागातील दवाखाने हाउसफुल आसल्या कारणाने रेफर रुग्णांनची तालुक्याच्या ठिकाणी जान्यास होणारी हेडसाळ लक्षात घेऊन गेवराई तलवाडा बस सेवा पूर्ववत करण्याची मागणी निवेदनाव्दारे आक्रम सौदागर व सरपंच पती विष्णु हात्ते यांनी गेवराई आगार प्रमुखांना केली आहे.