Live महाराष्ट्र न्यूज चे तालुका प्रतिनिधी लक्ष्मण पाटील यांचा GSA स्कुलमध्ये सत्कार…

🔸कुटुंबातील सन्मान लाखमोलाचा – लक्ष्मण पाटील

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी. डी.पाटील सर)

धरणगाव(दि.29सप्टेंबर):– येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुल चे उपशिक्षक लक्ष्मण पाटील यांची Live महाराष्ट्र न्यूज च्या तालुका प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल शाळेत त्यांचा सत्कार करण्यात आला.याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुड शेपर्ड स्कुल चे उपक्रमशील शिक्षक लक्ष्मण पाटील यांची Live महाराष्ट्र न्यूज च्या तालुका प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे आणि शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम प्रसंगी सत्काराला उत्तर देतांना लक्ष्मण पाटील म्हणाले की, बाहेर व्यक्ती कितीही चांगल्या प्रकारे काम करत असला तरी त्याच्या कार्याची दखल घेऊन जिथे तो व्यक्ती कार्यरत असतो तिथे म्हणजेच आपल्या कुटुंबात झालेला सन्मान नेहमीच लाखमोलाचा असतो.

या कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, माध्यमिक च्या मुख्याध्यापिका नाजनिन शेख, जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, स्वाती भावे, पूनम कासार, शिरीन खाटीक, ग्रीष्मा पाटील, गायत्री सोनवणे, सपना पाटील, लक्ष्मण पाटील, अमोल सोनार हे सर्व शिक्षकवर्ग तसेच सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा व अमोल देशमुख हे शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी पाटील सरांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्यात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माध्यमिक च्या मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांनी केले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED