तेली समाजाचे मानचिन्ह व शेतकरींची सोशल मिडियावर अवमानकारक पोष्ट टाकणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी म्हणून महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे वतीने धुळ्यात जिल्हाधिकारी व पोलीस प्रमुखांना निवेदन

28

✒️प्रतिनिधी प्रतिनिधी(संजय कोळी)

धुळे(दि.29सप्टेंबर):– तेली समाजाचे मानचिन्ह असलेल्या तेलघाणीसह शेतकऱ्यांचा सोशल मिडिया फेसबुकवर आक्षेपार्ह पोष्ट टाकणाऱ्या नितेश कराळे याच्यावर कार्यवाही व्हावी या मागणीसाठी जिल्हा अधिकारी यांना बुधवार दि. २९ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा वतीने उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील भामरे यांना देण्यात आले त्यानंतर धुळे जिल्हा पोलिस प्रमुख यांनाही निवेदन देण्यात आले.

वर्धा येथील नितेश कराळे याने सोशल मिडीया फेसबुकवर तेली समाजाचे मानचिन्ह असलेल्या तेलघाणीसह शेतकऱ्यांचा अवमान करणारे व्यंगचित्र टाकून तेली समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला . निवेदनासोबत फेसबुकवर टाकलेली पोष्टची सत्यप्रत जोडली आहे. नितेश कराळे याचा आम्ही जाहिर निषेध करत असून त्याने तेली समाजाची माफी मागावी.

तसेच नितेश कराळे . वर्धा यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी असे निवेदनाद्वारे मागणी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा प्रदेश नरेंद्र चौधरी, जिल्हा अध्यक्ष कैलास चौधरी, विभागीय उपाध्यक्ष तुषार चौधरी , वैद्यकीय आघाडी राज्य उपाध्यक्ष डॉ. भूषण चौधरी, सेवा आघाडी जिल्हाध्यक्ष सुभाष जाधव, जिल्हाध्यक्ष युवा आघाडी दिनेश बागुल, तेली पंच मंडळ युवक जिल्हा अध्यक्ष गोविंद चौधरी, शहर सेवा आघाडी अध्यक्ष रमेश करनकाळ, उपाध्यक्ष किशोर थोरात,युवा जिल्हा सचिव संदीप चौधरी, विभागीय उपाध्यक्ष सतीश चौधरी, विभागीय उपाध्यक्ष अनिल अहिरराव, सेवा आघाडी सचिव पोपटराव चौधरी, जिल्हा समन्वयक महेश चौधरी, धुळे जिल्हा उपसंघटक विनोद चौधरी, प्रवक्ता किशन थोरात, सचिन काशिनाथ चौधरी, महेश बाविस्कर, उदय श्रीराम चौधरी, जिल्हा प्रवक्ता किरण श्रीराम बागुल, उपाध्यक्ष अनिल थोरात, वकील आघाडी जिल्हा सचिव ललित अशोक महाले, युवा आघाडी माजी जिल्हा अध्यक्ष बबन चौधरी, मुकेश श्रीराम चौधरी चौधरी, युवा नेते सुरेश वामन चौधरी, शाम चौधरी,यशवंत चौधरी आदिंनी केले आहे.