“हक्काचे वेतन दया अन्यथा बारामती एग्रो ची चिमनी पेटू देणार नाही” – सतिष पट्टेकर

28

✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

कन्नड़(दि.२९सप्टेंबर):-बारामती शुगर्स एग्रो लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बैंकेच्या विरोधात 967 साखर कामगरांचे चिमनी बंद आंदोलनाचे ऐलान.कन्नड़ डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आज कामगरांची जाहिर बैठक झाली. या मधे सर्वानुमाते खालील प्रमाणे ठराव पारित करण्यात आले असुन त्या दिशेने आंदोलन उभे राहणार आहे.

पँथरसेना सामजिक संघटनेचे अध्यक्ष सतिष पट्टेकर यानी या वेळी कामगरांची फसवणूक केल्या बद्दल बैंकेचे तत्कालीन संचालक अजित पवार, कारखाण्याचे संचालक रोहित पवार यांचा निषेध नोंदऊँन करखान्याच्या खरेदी विक्री व्यवहारा महाराष्ट्र बैंकेच्या तत्कालीन संचालक आणि आताचे संचालक यांची तक्रार ईडी आणि केंद्रीय सहकार मंत्र्या कड़े केली जाणार आहे.

तसेच सना सुदीचे दिवस आहेत, अजित पवार आणि रोहित पवार यांनी बैंकेला कामगरांचे वेतन देण्याचे सांगावे जेने करुण कामगरांच्या घरावर ही स्वराज्याचे झेंडे लागतील त्यांचा ही पाडवा दिवाळी साजरी होईल.जानता राज्यानी स्वतःच्या मुलगी,पुतन्या, नातु यांच्या भविष्याची ज्या पद्धतीने काळजी घेतली आहे, तसिच कामगरांची ही घ्यावी, त्यांचे वेतन,स्थानिकाना रोजगार दयावा असे आवाहन केले.

बीआरएसपी जिल्हाध्यक्ष अरविंद भाई कांबळे यानी ही अतिशय आक्रमकपने कामगरांच्या प्रश्नावर आन्दोलनाची भूमिका मांडली. कामगरांचे हक्काचे वेतन जो पर्यंत मिळणार नाही, तो पर्यंत संपूर्ण ताकदिने बीआरएसपी त्यांच्या साठि लढत राहणार. तसेच त्यांनी आवाहन केले की हे सरकार मुके बहिरे आणि आंधळे आहे यांना झोपेतुंन जागे करन्यासाठी यांच्या काना पाशी खाड़कान आवाज काढावा लागेल आणि ते काम आम्ही करणार आहोत.

तसेच आंदोलनाचा आगाज झाला आहे,थिंनंगी पेटली आहे, जो पर्यंत यश येत नाही तो पर्यंत हा अग्नि असाच ठेवत ठेवावा लागेल असे ही त्यांनी या वेळी सांगितले, व या पुढे कोणताही कामगाराचा या दरम्यान मृत्यु झाला तर त्यांचा अत्यंविधि एक तर बारामती शुगर्स एग्रो कारखान्यात होईल किंवा महाराष्ट्र राज्य सहकारी बैंकेत होईल. आणि या मुळे जी ही परिस्थिति निर्माण होईल तिला फक्त आणि फक्त बारामती कारखाना आणि महाराष्ट्र बैंक जबाबदार राहील असे ही ठनकाऊन संगीताले.

तसेच या वेळी औरंगाबाद चे बीआरएसपी शहर अध्यक्ष निसार भाई यांनी ही विचार मांडले, या वेळी अजीम भाई, दीपक भाई डांगरे आणि मोठ्या संखेने कामगार त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.