फसवणुकीची अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असलेल्या आरोपी ललीत बद्रीनारायण राठी ने खामगांव बाजार समितीची केली फसवणुक

95

🔹शेतकर्‍यांची फसवणुक झाल्यास जबाबदार कोण?

✒️खामगाव प्रतिनिधी(मनोज नगरनाईक)

खामगाव(दि.29सप्टेंबर):-बाजार समितीच्या परवान्याची मुदत संपुष्टात आली असतांना त्याच परवान्यावर अडत व्यवहार करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी खामगाव बाजार समितीमधील बद्रीनारायण राठी या अडतचे संचालक ललित बद्रीनारायण राठी यांना तीन दिवसात स्पष्टीकरण सादर करण्याची नोटीस समितीच्या सचिवांनी सोमवारी दिली आहे. बाजार समितीमध्ये बद्रीनारायण राठी या नावाने अडत्याचा परवाना घेतला. या परवान्याची मुदत 31 मार्च 2021 रोजी संपुष्टात आली.

त्यानंतरही संचालक ललित राठी यांनी 25 मे 2021 पर्यंत बाजार समितीमध्ये अडत व्यवसाय केला. त्यातून बाजार समितीचे मोठे नुकसान करण्यात आले. विशेष म्हणजे, बाजार समितीमध्ये फर्म कोणत्या नावाने तर त्याचवेळी गाळे कोणाच्या नावाने असेही प्रकार घडले आहेत, बंद असलेल्या फर्मच्या नावे लिलाव शेडवर बोर्ड लावण्यात आले आहेत. या प्रकाराची तक्रारं करून समितीची दफ्तर तपासणी करावी, अशी मागणी नंदलाल भट्टड यांनी सातत्याने केली आहे. त्याकडे दुर्लक्ष असल्याने बद्रीनारायण राठी.यांचा परवाना संपुष्टात आल्यानंतरही व्यवहार सुरू ठेवल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे, विविध नावांनी परवाने काढलेले असताना बाजार समितीचा सेस भरण्यालाही फाटा देण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार बाजार समितीच्या सचिवांनी बद्रीनारायण राठी अडतचे संचालक ललित राठी यांना कारणे दाखवा नोटीस देत तीन दिवसात स्पष्टीकरण मागवले आहे.

चौकट
फसवणुकीच्या गुन्हयामध्ये अनेकवेळा जेलयात्रा करुन आलेल्या आरोपी ललीत राठी याला बाजार समितीचे सचिव भिसे यांचे पाठबळ असल्यामुळे त्याचे व त्याच्या परिवाराचे नावाने असलेले विवीध परवान रद्द न करता बंद असलेल्या परवान्यावर लाखो रुपयाचा व्यवहार झाला कसा? या अवैध व्यवहारामुळे बाजार समिती, जि. एस. टी. विभाग आणि आयकर विभागाचे खुप मोठे नुकसान झालेले आहे. आता संबधित विभागाने झालेल्या नुकसानीच्या वसुलीसाठी कार्यवाही करणे अपेक्षीत आहे. नंदलाल भट्टड यांच्या दक्षतेमुळे हे प्रकरण चव्हाटयावर आले आहे.