पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड(ओझर)नामकरण समितीच्या वतीने 15 ऑक्टोबर रोजी कर्मवीर दादासाहेब गायकवाड जयंती जल्लोषात साजरी करणार-अण्णासाहेब कटारे

30

✒️जिल्हा प्रतिनिधी,नाशिक(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.30सप्टेंबर):- पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड विमानतळ(ओझर) नामकरण समिती नाशिकची महत्त्वपूर्ण आढावा बैठक नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात मुख्य निमंत्रक अण्णासाहेब कटारे* यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

या बैठकीत आत्तापर्यंत केलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला तसेच लवकरच *महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे*,राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार,विरोधी पक्षनेते मा.देवेंद्रजी फडणवीस,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. नानासाहेब पटोले यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून मागणीनामा सादर करण्यात येईल व केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री माननीय ना. रामदास आठवले व केंद्रीय आरोग्य मंत्री माननीय ना. भारतीताई पवार यांच्या माध्यमातून लवकरच देशाचे केंद्रीय उड्डाण मंत्री माननीय ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून ओझर विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्यात यावे हा मागणीनामा सादर करण्याचे ठरले.

तसेच नामकरणाची ही चळवळ सांस्कृतिक व प्रबोधनाच्या माध्यमातून सर्व नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी
*कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची जयंती 15 ऑक्टोबर 2021 रोजी मोठ्या जल्लोषात साजरी करण्याचे ठरले असल्याने यात सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे नाशिकच्या सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन मुख्य निमञंक अण्णा साहेब कटारे यांनी केले आहे.

याप्रसंगी समितीचे समाज भूषण बाळासाहेब शिंदे, दिपचंद दोंदे ,राजेंद्र गायकवाड, विलासराज गायकवाड ,भिवानंद आप्पा काळे,मदन अण्णा शिंदे, भारत जी पुजारी,राजाभाऊ गांगुर्डे, आदेश भाऊ पगारे,अनिल जी आठवले,सुरेश नेटावटे,राजूनाना लोखंडे,मीनाक्षी पवार,पंडित नेटावटे, प्रशांत कटारे,जितू भाऊ बागुल,प्रवीण नेटावटे,प्रशांत शिंदे शिवाजी गायकवाड पञकार शातांरामभाऊ दुनबळे, अनिल आठवले सह पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते