नदीला महापुर आल्याने जनजीवन विस्कळित,अनेकांची घरे पाण्याखाली

31

✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

केज(दि.30सप्टेबंर):-केज तालुक्यातले माजंरा धरण आज दि,२८ रोजी ओव्हरफोल झाल्यामुळे ईस्थळ नायगाव आपेगाव सौंदाना या गावामधे जनजीवन विस्कळीत झाले आहे. माजंरा धरणाचे आठरा दरवाजे उघल्यामुळे माजंरा धरणा काठच्या गावामध्ये सर्वत्र पाणी पाणी झाले आहे. शेतकऱ्यांच्या सर्व पिकामध्ये पाणी झाल्यामुळे सर्व पिकांचे नुकसान झाले आहे. बीड उस्मानाबाद जिल्ह्याच्या बॉर्डर ईस्थळ वाकडी हे गावे आहेत. या गावामधे सर्वत्र घरामध्ये पाणी आले आहे. नागरिक जीव मुठीत घेवून राहावे लागत आहे. तर काही नागरिक केज तालुक्याल्या बनसारोळा या गावामधल्या जिल्हा परिषद शाळेत व महाराष्ट्र विध्यालयात स्थलांतर झाले आहेत. तर काही नागरिक आपल्या नातेवाईकाडे स्थलांतर झाले आहेत. कळंब तालुक्यातल्या वाकडी या गावामध्ये नागरिक पाण्यात आडकले होते.त्यांना वाचवण्यासाठी एन डी ए ची टिमने मोठी कामगीरी करत सुखरुप नागरिकांना बाहेर काडले आहे. त्यामुळे एन डी एच्या टिमचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी बनसारोळा गावचे सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ धायगुडे यांनी ईस्थळ या गावाला भेट देवून नागरिकांना आधार दिला आहे. व गोर गरीब कष्टकरी दीन दलित समाजाकडे राजकीय पुढाऱ्यांचे लक्ष नाही .तरी शासनाने ईस्थळ नायगाव सौदांना आपेगाव या गावातील पाण्याखाली घरे गेलेल्या नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावे. व त्याच बरोबर माजंरा धरणाच्या काठच्या गावाच्या शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे .त्यांना ही सरसकट मदत देण्यात यावी .तसेच बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करण्यात यावा. ईस्थळ या गावातील नागरिकांचे पुनर्वसन करण्यात यावे .आसे आव्हान राजाभाऊ धायगुडे यांनी केले .यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल जोगदंड नवघण आबा उमेश रोमन मारुती नवघण व पुरोगामी पत्रकार संघाचे बीड जिल्हा सचिव धिवार राजकुमार उपस्थित होते