अन्यायग्रस्तांचे कैवारी,तालुक्यासह जिल्ह्याचा चालताबोलता इतिहास,शब्दसम्राट प्रफुल्लभाऊ सहस्त्रबुद्धे

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.30सप्टेंबर):-आपल्या अभ्यासु,दमदार आणि व्यापक आणि मूल्यवर्धित लेखणीच्या माध्यमातून स्वयंभू शक्ती आणि युक्तीच्या माध्यमातून अत्यंत खडतर वाटचाल करत समाज रचनेतील विविध आयाम एकत्र करून समतेसाठी न्याय हक्क आणि वंचित घटकांच्या सत्यासाठी अहोरात्र लेखणीच्या माध्यमातून झगडणारा पत्रकार अशी ख्याती गेल्या अनेक दशके निर्माण केलेल्या आष्टी येथील ज्येष्ठ पत्रकार अर्थात प्रफुल्लभाऊ सहस्त्रबुद्धे यांच्या नावाचा आदरार्थी सन्मानाने उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे!

मानवी देह पंचमहाभूतांचा बनलेला झाला आहे असे म्हणतात अशा या शरीरामध्ये आयुष्यभर स्वतःसाठी नव्हे तर इतरांच्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून योगदान देणारे बोटावर मोजण्याइतके असतात.अशा मोजक्या मंडळींमध्ये लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हटल्या जाणाऱ्या..पत्रकारितेमध्ये स्वतःला गुरफटून घेऊन अहोरात्र सेवा करणारे.. पत्रकारितेच्या क्षेत्रातील साक्षात ‘वारकरी’ अशी प्रतिमा निर्माण झालेल्या प्रफुल्लभाऊंचा समस्त पत्रकार बंधूंना अभिमान वाटत आला आहे…प्रफुल्लभाऊ हे मुळात संवेदनशील मनाचे आणि हळव्या स्थितीचे एक सह्रदयी प्रांजळ माणूस आहेत.

समाजाच्या विविध स्थितीबद्दल त्यांना सातत्याने चिंता व्यक्त वाटली आणि म्हणून त्यांच्या लेखनीतून चिंतनात्मक,ललित लेखणीने अनेक वेळा व्यक्त झाले.साहित्य क्षेत्रामध्ये आघाडीचे ज्येष्ठ पत्रकार म्हणून भाऊंच्या समाजव्यवस्थेत मानवी जगण्याला या पातळीवर आणून सोडले आहे.त्याबद्दल सदैव त्यांना अस्वस्थ केले.या युगातील मानवी दुःख,एकाकीपणा,जीवनातील अस्थिरता,दहशत,सर्वव्यापी भय आणि पराधीनता या सार्‍यांचे चित्रण समृद्ध आणि समर्पक प्रतिमांचा वापर करून त्यांनी आपल्या लेखन साहित्यातून आणि पत्रकारितेतून केला.त्यांची भाषा अन् लेखन अंतरंग उलगडून दाखवणारे आहे.निसर्ग,शेतकरी,कामगार,वंचित घटक,बेरोजगारी,दारिद्र्य आणि मानवी समाजव्यवस्थेला भेडसवणाऱ्या विविध समस्या या अनुषंगाने या स्तरावर या दिशेने त्यांनी गेल्या कित्येक वर्ष लेखणी झिजवत दिशा दाखवण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला.

तब्बल ४० वर्षापासून म्हणजे १९८० च्या दशकापासून प्रफुल्लभाऊंचा लेखणीच्या क्षेत्रातील प्रवास स्वयंभू सुरू झाला.यामध्ये दैनिक तरुण भारत,दैनिक दिव्य मराठी या विभागीय पातळीवरील दैनिकांमध्ये तालुका प्रतिनिधी म्हणून त्यांनी निर्माण केलेले स्थान अद्वितीय आहे.तरुण भारत मध्ये १९९५ पर्यंत तर २००० पासून १० वर्षात तब्बल दैनिक दिव्य मराठीमध्ये स्वतःला झोकून दिले.ही समाजसेवा करताना त्यांनी गरिबांचे दुःख वेशीला टांगुन शासन दरबारी मांडले,किंबहुना ते सोडवण्यासाठी खारीचा वाटाही उचलला.आष्टी परिसर १९८८ पासून १० वर्षे साप्ताहिक चालवले.मी त्यांच्या या साप्ताहिकाचा पहिला पत्रकार होतो.प्रफुल्लभाऊंच्या बोटाला धरुनच पत्रकारिता क्षेत्रात आलो.जेष्ठ पत्रकार अनंत हंबर्डे सर,सिताराम पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली मी पत्रकारिता सुरु केली आणि पत्रपंडीत मोतीरामजी वरपे दादा आणि रत्नाकरभाऊ वरपे यांच्या मदतीने आणि आशीर्वादाने घडलो.प्रफुल्लभाऊ यांनी मध्यंतरी प्रिटिंग प्रेसचा व्यवसायही केला.त्यानंतर माजी मंत्री आमदार सुरेश धस यांचे २० वर्षापासून स्वीय सहाय्यक म्हणून कार्य करतात.आष्टी येथील जेष्ठ पत्रकार अनंत हंबर्डे यांच्यानंतर प्रफुल्लभाऊ आणि प्रफुल्लभाऊ यांच्यानंतर माझाच सिनिअर पत्रकार असा नंबर येतो.प्रफुल्लभाऊ यांची लेखणी दमदार आणि व्यापक स्वरूपामध्ये व्यासंगी लेखन करण्यात आघाडीवर आहे.

ते आष्टी तालुका पत्रकार संघाचे जेष्ठ मार्गदर्शक,निर्भीड लेखणीचे धनी,संवेदनशील लेखणी,सामजिक आणि विविध पक्षातील राजकीय जाणकार,अन्यायग्रस्तांचे कैवारी,तालुक्यासह जिल्ह्याचा चालता बोलता इतिहास,शब्दसम्राट,प्रेमळ,सर्वांचे मार्गदर्शक आणि गुरूवर्य प्रफुल्लभाऊ सहस्रबुद्धे यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.!

प्रफुलभाऊंसाठी एवढेच म्हणावे वाटते,
“स्नेहाचे आपले बंध,
शुभेच्छांनी बहरुन येतील..!
उधळीत रंग सदिच्छांचे
शब्द शब्दांना कवेत घेतील..!!

✒️लेखक:-उत्तम बोडखे,आष्टी(९४२३४७१४९०)

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED