प्रतिक्षा पवार यांची अखिल भारतीय बंजारा बोलिवुड इंडस्ट्री संघटनेच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती

30

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(ता.जिवती प्रतिनिधी)

जिवती(दि.30सप्टेंबर):-अतिदुर्गम आदिवासी भाग म्हणुन ओळखला जाणाऱ्या जिवती तालुक्यातील पिट्टीगुडा येथील प्रतिक्षा धोडिंराम पवार यांची अखिल भारतीय बंजारा बोलिवुड इंडस्ट्री संघटनेच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष पदी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अरविंद भाऊ चव्हाण व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुनिल भाऊ राठोड यांच्या नेतृत्वात नियुक्ती करण्यात आली आहे व कला या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व पदाधिकारी यांचे स्वप्न साकार करण्याच्या हेतुने आम्ही हा मंच उभा केले.

यांच्या माध्यमातून समाजात जागृक्ता निर्माण होईल आवड निर्माण होईल असे व्यक्ति महत्व विचारात्मक आव्हान या वेळी अखिल भारतीय बंजारा बोलिवुड इंडस्ट्री संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अरविंद भाऊ चव्हाण यांनी केले व अखिल भारतीय बंजारा बोलिवुड इंडस्ट्री संघटनेच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष पदी प्रतिक्षा पवार यांच्या नियुक्ती बद्धल सामाजिक राजकिय व कला या क्षेत्रातुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले