दोंडाईचा शहरातील महाविद्यालयांमध्ये लसीकरण मोहिम राबवा : युवासेना धुळे जिल्हाप्रमुख आकाश कोळी यांची मागणी

28

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.30सप्टेंबर):-(एस.के) : शहरातील पी.बी.बागल, अहिंसा पॉलिटेक्नीक, नुतन कनिष्‍ठ महाविद्यालयांसह शहरातील सर्व 18 वर्षावरील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात यावी, अशी मागणी दोंडाईचा शिवसेना-युवासेनेतर्फे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक भुषण काटे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.निवेदनात नमुद केले की, लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात नंबर एक वर आहे. 18 वर्षावरील सर्वांना सरसकट लसीकरण सुरु झाले असून शहरातील महाविद्यालय कोविड-19 मुळे बंद अवस्थेत आहेत.

अनेक विद्यार्थी-विद्यार्थीनी लस घेण्यापासुन वंचित आहेत. प्रत्येक महाविद्यालयच्या संपर्कात विद्यार्थी असतात. उपजिल्हा रुग्णालय व महाविद्यालय प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष लसीकरण मोहिम राबविल्यास त्यास युवासेना टीम स्वत: उपस्थित राहुन सर्वोतपरी सहकार्य करतील. ही विशेष लसीकरण मोहिम राबविल्यास दोंडाईचा शहरातील लसीकरण हे 100 टक्के पूर्ण होण्यास मदतच होईल. यासाठी अहिंसा पॉलिटेक्नीक येथे 250 लसी, पी.बी.बागल महाविद्यालय येथे 250 लसी, नुतन ज्युनिअर महाविद्यालय 200 लसींचा डोस उपजिल्हा रुग्णालयातर्फे पुरविण्यात यावा, असेही निवेदनात शेवटी नमुद केले आहे.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, युवासेना जिल्हाप्रमुख आकाश कोळी, उपतालुकाप्रमुख शैलेश सोनार, युवासेना शहरप्रमुख सागर पवार, युवासेना उपशहरप्रमुख योगेश बोरसे, भुषण चौधरी, राकेश पाटील, गणेश विसावे, नरेंद्र धात्रक, नाना पारधी, पल्या पारधी, सागर पाटील, धनसिंग वसावे यासह युवासैनिक उपस्थित होते.