4 ऑक्टोंबर 2021 रोजी पासून शाळा सुरु करण्यास परवानगी

25

🔹ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते 12 वी व शहरी भागातील इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरु

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.30 सप्टेंबर):-राज्य शासनाने संदर्भ क्र. 04 चे परिपत्रकान्वये राज्यातील कोविड मुक्त ग्रामीण भागात पहील्या टप्प्यात इयत्ता 8 वी ते इयत्ता 12 वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमीत करून त्याअन्वये इयत्ता 8 वी ते इयत्ता 12 वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरु शासन मान्यतेने सुरू करण्यात आले. तसेच संदर्भ क्र.09 चे परिपत्रकान्वये दिनांक 07 जुलै 2021 व दिनांक 10 ऑगस्ट, 2021 नुसार देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांसह सदर परिपत्रकात नमूद अतिरिक्त मार्गदर्शक सूचनांचे पालन करून राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते 12 वी व शहरी भागातील इयत्ता 8 वी 12 वी चे वर्ग दि.04 ऑक्टोंबर, 2021 रोजी पासून सुरु करण्यास शासन मान्यता निर्गमित करण्यात आली होती.

श्री. अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, चंद्रपूर जिल्हयातील कोविड मुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायतींनी संदर्भ क्र. 04 चे शासन परिपत्रकानुसार ठराव घेऊन आणि शासन परिपत्रकातील निकष तसेच परिशिष्ट अ व परिशिष्ट ब यामध्ये नमुद केलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून, तसेच संदर्भिय शासन परिपत्रक क्र.06 नुसार देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांसह संदर्भिय क्र. 09 चे परिपत्रकात नमूद अतिरिक्त मार्गदर्शक सूचनांचे पालन करून चंद्रपूर जिल्हयामधील ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते 12 वी व शहरी भागातील इयत्ता 8 वी ते 12 वी च्या शाळेचे वर्ग दि. 04 ऑक्टोंबर 2021 रोजी पासून सुरु करण्यास परवानगी प्रदान करण्यात येत आहे असे जिल्हाधिकारी यांच्याकडून कळविले आहे.