शास.औ.प्र. संस्थेतर्फे २० प्रशिक्षणार्थ्यांना पिएसए आॕक्सिजन प्लॕन्टचे यशस्वी प्रशिक्षण….

🔹प्रशिक्षणार्थ्यांना रोजगारांसोबतच सेवेची संधी – प्राचार्य सांळुके

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.30सप्टेंबर):-कोरोना महामारी काळात उद्भवलेली परिस्थिती सांभाळण्यासाठी आॕक्सिजन प्लॕन्टची गरज निर्माण झाली होती. आजही दिवसेंदिवस आॕक्सिजन ची आवश्यकता मोठ्या प्रमाणात वैद्यक क्षेत्रात जाणवू लागल्याने शासनाने आॕपरेशन ॲण्ड मेंटेनन्स आॕफ पिएसए आॕक्सिजन प्लॕन्टच्या प्रशिक्षण कार्यक्रमास सुरूवात केलेली आहे. हे प्रशिक्षण म्हणजे रोजगारासोबतच मानवसेवेची अमोल संधी आपल्याला मिळाली असल्याचे मत प्राचार्य संतोष सांळुके यांनी व्यक्त केले. ते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे देण्यात आलेल्या पीएसए आॕक्सिजन प्लॕन्ट प्रशिक्षणाचा समारोपाप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी गटनिदेशक मधुपवार, इखे,बोंद्रे, पुराम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रास्तविक उज्वल लेवडीवर यांनी केले. संस्थेचे माजी प्रशिक्षणार्थी आणि अर्ज केलेल्या इच्छूक उमेदवारांपैकी निवड झालेल्या एकूण २० प्रशिक्षणार्थ्यांना आॕपरेशन ॲण्ड मेंटेनन्स आॕफ पिएसए आॕक्सिजन प्लॕन्टचे प्रशिक्षण दि. १४ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर २०२१ यादरम्यान देण्यात आले. महाराष्ट्र आणि गोव्याचे प्रमुख तथा सीएनसीटीआय मुंबईचे रघुनाथ वारूडे यांच्या प्रमुख हे मार्गदर्शनात पार पडले . संस्थेचे निदेशक उज्वल लेवडीवार आणि तुषार कोडापे यांनी रोज ५ तास याप्रमाणे सदर प्रशिक्षण जोडारी विभागात प्रशिक्षणार्थ्यांना दिले. यात त्यांना आॕक्सिजन ची निर्मिती ,उपयोग ,सिलेंडरची हाताळणी यासंबंधीचे प्रात्यक्षिके घेण्यात आलेली आहे. तसेच ह्या प्रशिक्षणार्थ्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात प्रत्यक्ष नेऊन उभारण्यात आलेल्या पिएसए आॕक्सिजन प्लॕन्टला भेट देण्यात आली.

करण मरसकोल्हे,आदित्य पारधी,विशाल चौधरी ,सुशांत कत्रोजवार ,ईश्वर कोलते,शुभम बारसागडे ,निहाल भेंडारे, मनोज पाल, प्रफुल उपरीकर, विजय राऊत, महेश आटे, सुमित गायकवाड , आदित्य डहाके, सुनिल मडावी, मयुर जांभूळकर , नंदकिशोर नारनवरे, डंभाजी कोलते, रोशन तरारे, रूपेश गेडाम,निहाल भोयर इत्यादी २० प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेले असून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे. त्यांना लवकरच परीक्षेनंतर डिजीइटी कडून प्रमाणपत्र मिळणार आहे.

गडचिरोली, महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED