निलेश रितेश पुरोहित यांचा मानवविकास परिषदेकडून सत्कार

25

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधि)

पुसद(ता.30सप्टेंबर):-अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या सीए (चार्टर्ड अकाउंटंट) इंटरमीडिएट परीक्षा नुकतीच निलेश रितेश पुरोहित यांनी यशस्वीरित्या उत्तीर्ण केली त्यानिमित्ताने मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्य यांचे पदाधिकारी यांनी यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पॉलिटिक्स स्पेशल कार्यालयात सत्कार केला व तसेच भावी वाटचालीबद्दल शुभेच्छाही दिल्या.

यावेळी मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष बळवंत मनवर, यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष अनिल चव्हाण, पुसद तालुका अध्यक्ष मोहम्मद हमीद निरबान, पुसद तालुका सचिव मोहम्मद कयुम याकूब चव्हाण, शेख समीर रब्बानी मीडिया प्रमुख पुसद तालुका तसेच पॉलिटिक्स स्पेशल चे यु.एन.वानखेडे उपस्थित होते.