गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षेत राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयाचे विद्यार्थी अव्वल

29

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.30सप्टेंबर):-गांधी शिक्षण समिती चिमूर द्वारा संचालित व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीशी संलग्नित तथा नॅक मूल्यांकन ‘ब’ श्रेणी प्राप्त स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर येथील सन २०२०-२१ करिता विद्यापीठाची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली. यात महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. राणी सुखदेव चौधरी बी. ए. स्नातक परीक्षेत पाचवी मेरीट आली. तर पदव्युत्तर विभागातून समाजशास्त्र विभाग आपली परंपरा कायम ठेवत एम.ए. समाजशास्त्र विभागातून मारोती रामेश्वर झाडे गुणानुक्रमे विद्यापीठातून तिसरा मेरीट तर किशोर नामदेव चटपकर विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये गुणानुक्रमे सहावा मेरीट आला.

या विशेष प्राविण्य प्राप्त गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन गांधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक यावले, सचिव प्रा. विनायकराव कापसे, संस्था पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य प्रा. कार्तिक पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रफुल बन्सोड, वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. हरेश गजभिये, समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. पितांबर पिसे, प्रा. डॉ. नितीन कत्रोजवार, प्रा. प्रफुल राजुरवाडे, प्रा. डॉ. राजेश्वर रहांगडले, प्रा. डॉ. लक्ष्मन कामडी, प्रा. डॉ. उदय मेंडूलकर, प्रा. आशुतोष पोपटे तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मित्रांनी गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.