आष्टीत अवैधपणे तांदूळ वाहतूक करणारा ट्रक पकडला

26

🔺अंदाजे 5लाख 28 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

🔺एस. बी. ट्रेडिंग कंपनी आष्टीचे संचालक सोनल बोनगिरवार यांचा तांदूळ असल्याचे झाले उघड

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालुका प्रतिनिधी)मो:-9404071883

चामोर्शी(दि.30सप्टेंबर):-तालूक्यातील आष्टी येथील वर्षा पेट्रोलपंप समोर MH34 AB-9947 या क्रमांकाचा तांदूळ वाहतूक करणारा ट्रक उभा असल्याची गोपनीय माहिती चामोर्शीचे तहसीलदार जितेंद्र सिकतोड़े यांना मिळाली असता तहसीलदार यांनी तात्काळ एक चमु पाठविले व चमूने तात्काळ आष्टी येथे येऊन सदर ट्रकची तपासणी केली असता पाठीमागे रंगीबेरंगी 480 गोणीमध्ये एकूण 240 क्विंटल तांदूळ आढळून आले. सदर माल बाजारभावा प्रमाणे अंदाजे 5 लाख 28 हजार रुपयांचा असून चालकाकडून अधिक चौकशी केली असता ट्रक मध्ये असलेला तांदूळ आष्टी येथील एस. बी. ट्रेडिंग कंपनी आष्टीचे संचालक सोनल बोनगिरवार यांचा असल्याचे उघड झाले.

सदर तांदूळ वैध की अवैध आहे याचा अधिक तपास करण्यासाठी सदर ट्रक ताब्यात घेऊन ट्रक चामोर्शी येथे नेण्यात आले असल्याची माहिती तपासी अधिकारी भांडेकर यानी दिले.या कार्यवाहीकड़े आष्टिवासियांसह चंद्रपूर- गडचिरोली जिल्ह्यातील जनतेचे लक्ष केंद्रीत झाले आहे, या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.