ब्रम्हपुरी पत्रकार संघातर्फे प्रा. अन्सारी सरांना भावपूर्ण श्रध्दांजली

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.30सप्टेंबर):-ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रा. नुरुल अन्सारी सरांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने काल रात्री ११ वाजता दु:खत निधन झाले. त्यांना ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघा तर्फे भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण शिवाजी चौक येथील विश्राम गृह येथे आज दि. ३०/९/२१ ला गुरुवारी दुपारी ४:३० वाजता श्रध्दांजली कार्यक्रम घेण्यात आले.

यावेळी माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर, जेष्ठ पत्रकार मिश्रा ,पत्रकार नेताजी मेश्राम, प्रा. श्याम करंबे, प्रा. रवी रणदिवे, प्रा. धनराज खानोरकर, दिलीप शिनखेडे, दिपक पत्रे, गोवर्धन दोनाडकर , शिवराज मालवि, महेश पिलारे, नंदू गुडेवार, विनोद दोनाडकर व ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघाचे सर्व सदस्यांनी उपस्थित होते.

महाराष्ट्र, विदर्भ
©️ALL RIGHT RESERVED