गडचिरोली आय.टी.आय मध्ये आजी – माजी प्रशिक्षणार्थ्यांसाठी ॲप्रेंटीस मेळावा ४ आॕक्टोंबर रोजी आयोजित

31

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(1ऑक्टोबर):-धूत ट्रान्समिशन कंपनी औरंगाबाद या नामांकित कंपनीकरीता शास.औ.प्र. संस्था गडचिरोली ( प्लेसमेंट सेल) च्या वतीने येत्या ४आॕक्टोंबर रोजी दुपारी १२ वाजता भव्य अप्रेंटिस मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

इलेक्ट्रॉनिक्स मेकॕनिक ,विजतंत्री ,तारतंत्री, जोडारी ,संधाता,आयसिटीएसएम, मशिनिष्ट, कातारी ,प्लंबर, ड्राफ्टसमन मेकॕनिक ,फॕशन टेक्नालाॕजी, कोपा,एमएइई, डिझेल मेकॕनिक इत्यादी व्यवसायाचे आजी – माजी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी शास.औ.प्र.संस्था गडचिरोली येथे उपस्थित राहावे.

असे आवाहन संस्थेचे प्राचार्य संतोष सांळुके यांनी करत आहे. अधिक माहितीसाठी गटनिदेशक श्री.आनंद मधुपवार ( मोबा. 9322079941)यांच्याकडे संपर्क करावा. सदर एक वर्षीय मेगा अॕप्रेंटीस भरती १२९५ जागेसाठी करण्यात येणार असून ॲप्रेंटीस विद्यावेतन दरम्यान दरमहा ९८३६ रू. मिळणार आहे.