🔺तीन लाखाची (300000)लाच घेताना पी आय सह एजंटला अटक

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नासिक(दि.1ऑक्टोबर):- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला नाशिक मध्ये नासिक पोलीस ग्रामीण दलातील स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस उपनिरीक्षक महेश वामन राव शिंदे (38) आणि संजय आजाद खराडे वय (45)राहणार नासिक या एजंटचा रंगेहाथ पकडण्यात आले आहे आयपीएल सामन्याचे बॅटिंग सुरू असल्याने त्या विरोधात गुन्हा दाखल न करण्यासाठी त्यांनी तब्बल चार लाख रुपयाची लाचेची मागणी केली होती तडजोडी अंती ही रक्कम तीन लाख करण्याचे निश्चित झाले या संदर्भात ये सीबी कडे तक्रार करण्यात आली त्यांनी दखल घेत एसीबीने सापळा रचला त्यात शिंदे आणि खराडे हे रंगेहात पकडले गेले.

देवळाली कॅम्प येथील फ्लॅट वर आयपीएल क्रिकेट मॅच चे बॅटिंग तक्रारी सातत्याने येत होत्या याप्रकरणी गुन्हा दाखल न होऊ देण्यासाठी तसेच पुढे आयपीएल मॅच बॅटिंग चालू ठेवण्यासाठी लाच मागण्यात आली होती याप्रकरणी लाचलुचपत पथक कसून चौकशी करीत आहे व दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तब्बल तीन लाखाची लाच घेताना पी आय सह एजंटला अटक.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED