दिग्दर्शक सागर भोगे यांना दिल्लीहून द क्रेझी टेलस् दिल्ली या नामांकित संस्थेकडून सर्वोत्कृष्ट सर्जनशीलता व्यक्तिमत्त्व २०२१ हा पुरस्कार प्राप्त…!!!

32

✒️अमरावती(पुरोगामी संदेश नेटवर्क)

दिल्ली(दि.1ऑक्टोबर):- येथे झालेल्या रेडिसन ब्लू या हॉटेलमध्ये दिनांक २९ सप्टेंबर २०२१ ला “द क्रेझी टेलस्” या नामांकित संस्थेच्या वतीने अमरावती येथील दिग्दर्शक सागर भोगे यांना सर्वोत्कृष्ट सर्जनशीलता व्यक्तिमत्त्व २०२१ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सागर भोगे यांचा कलात्मक प्रवास १३ वर्षाचे असताना पासून सुरु झाला. शाळेच्या सांस्कृतिक महोत्सवात एकपात्री प्रयोग ते करत असायचे आणि नाटकासाठी त्यांना शाळेकडून प्रथम क्रमांक प्राप्त व्हायचे तसेच त्यांना यातून कलात्मक आत्मविश्वास मिळाला. आणि आज कलाक्षेत्रात त्यांचे ५० प्रोजेक्ट झाले असून त्या मध्ये मराठी लघुचित्रपट, हिंदी वेबसीरीज, मराठी वेबसिरीज, मराठी चित्रपट, मराठी व हिंदी गाणी असे प्रोजेक्ट आहेत. स्तब्ध एक सन्मान,पावटी ,पर्ण, रोल मॉडेल असे सामाजिक संदेश देणारे लघुचित्रपट आहेत .

सागर भोगे यांना कलाकारांसाठी कार्य करता यावे, कलावंतांना योग्य संधी व हक्काचे व्यासपीठ मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तसेच एकट्याने होत नाही रे ऐक जुड केलीच पाहिजे असा विचार ठेऊन कलानगरी वेलफेअर सोसायटी या संस्थेची स्थापना केली.संस्थेच्या माध्यमातून नव नवीन उपक्रम ,एकपात्री अभिनय स्पर्धा , गीत गायन स्पर्धा , काव्य स्पर्धा, कला हिरकणी पुरस्कार असे उपक्रम संस्थेच्या माध्यमातून कलावंतांनसाठी त्यांनी राबवले आहेत.कलानगरी वेलफेअर सोसायटी या संस्थेमार्फत महाराष्ट्रातील कलावंतांना व प्रेक्षकांना सूचक व योग्य बातम्या वाचण्याचे व्यासपीठ म्हणून त्यांनी कला जागर न्युज ची स्थापना देखील केली.त्यांना आता पर्यन्त बरेच पुरस्कार मिळालेले आहेत.

त्यांना मिळालेले पुरस्कार

१)आखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना शॉर्ट फिल्म फेस्टीवल २०१८ हा पुरस्कार “जीव रंगला” या गाण्यासाठी उत्तम दिग्दर्शक म्हणून मिळाला.

२)अमरावती स्पंदन परिवार बहुउद्देशीय संस्था कडून “उत्तम दिग्दर्शक” म्हणूनही पुरस्कार मिळाला आहे.

३)”द रिअल सुपर हिरो” २०२० हा पुरस्कार उत्तम दिग्दर्शनासाठी मिळाला.

४)कला पुरस्कार बहुजन साहित्य संघ बुलढाणा २०२० हा पुरस्कार उत्कृष्ट लिखाणा बद्दल मिळाला आहे.

५)”कोविड- १९” ग्रेट २०२० विनर- पुणे प्रवाह न्युज, हा पुरस्कार कोरोना काळात गरजूंना ब्लड आणि प्लाझ्मा डोनट केल्या बद्दल मिळाला.

६) “नवाडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल २०२१ बिहार” हा पुरस्कार त्यांना “बेस्ट युथ दिग्दर्शक” म्हणून कारोना काळातील पर्ण या लघुचित्रपटासाठी मिळाला आहे.

७)इंडियन टॅलेन्ट फिल्म फेस्टीवल २०२१ उत्तम कथा साठी हा पुरस्कार मिळाला आहे.

८) तसेच त्यांना भारत गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.जो की उत्तम दिग्दर्शकाला भारतात दिला जातो.

९) तसेच आर्ट्स बिट्स फाउंडेशन पुणे यांच्याकडून आर्ट्सबिट्स “महाराष्ट्र युवा कला गौरव पुरस्कार २०२१” हा उत्कृष्ट लेखक व दिग्दर्शक म्हणून मिळाला.

आणि आता नुकताच दिल्लीहून “द क्रेझी टेलस” दिल्ली या नामांकित संस्थेकडून सर्वोत्कृष्ट सर्जनशीलता व्यक्तिमत्त्व पुरस्कार प्राप्त झाला आहे.तसेच सर्व ठिकानहून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे…!!! असे दिग्दर्शक सागर भोगे यांना पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा व खूप खूप अभिनंदन…!!!