ब्रम्हपुरी मध्ये सिल्व्हर रंगाची स्वीफ्ट डिझायर कार मधून अवैध्य दारू जप्त

26

🔺सप्टेंबर २०२१ हया महीण्यात दारूबंदीच्या एकूण ३६ केसेस करण्यात आल्या असून त्यातून एकूण ८,२५,१२५ चा अवैध दारूचा मुद्देमाल जप्त

🔺ब्रम्हपुरी पोलिसांची अवैध्य दारू वर जब्बर छापेमारी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.३०सप्टेंबर):-आज दि. २७/०९/२१ रोजी रात्री ०८:०० वा दरम्यान पो.स्टे ब्रम्हपुरी येथील विशेष पथकास गुप्त माहीतीदाराद्वारे खबर मिळाली की ब्रम्हपुरी येथुन एका सिल्वर रंगाच्या स्वीफ्ट डिझायर गाडीने आरमोरी रोडने दारु वाहतुक होणार आहे. अशा माहीतीवरून आरमोरी रोड वरील अलंकार टॉकीज जवळ सापळा रचला ब्रम्हपुरी शिवाजी चौकाकडून आरमोरी रोड कडे येणारी संशयीत सिल्वर रंगाची स्वीफ्ट डीझायर कार जातांना दिसून आली तीचा पाठलाग करून थांबवले असता त्यामध्ये चार इसम बसलेले दिसून आले. सदर कार ची झडती केली.

असता कारच्या डिक्कीमध्ये रॉकेट देशी दारू संत्रा कंपनीची देशी दारू प्रत्येकी ९० ml च्या सिलबंद १०० बॉटल असलेले असे १५ बॉक्स दिसून आले. आरोपी राकेश अर्जुन कुर्झेकर (वय ३५) रा. कुर्झावार्ड ब्रम्हपुरी ता ब्रम्हपुरी जि. चंद्रपुर, जगदीश काशीनाथजी आमले, वय ६० वर्ष रा. धुम्मनखेडा वार्ड ब्रम्हपुरी , होमराज विठोबा दिघोरे वय ३२ वर्ष, रा. कुर्झा वार्ड ब्रम्हपुरी ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपुर, शेखर सुधाकर करानकर, वय २९ वर्ष रा धुम्मनखेडा ब्रम्हपुरी , हे त्यांच्या ताब्यातील सिल्व्हर रंगाची स्वीफ्ट डिझायर कार क. MH 02 BY1099 मधून अवैध रित्या दारू वाहतूक करताना मिळून आले.

त्यांचे ताब्यातून १) रॉकेट देशी दारू संत्रा कंपनीची देशी दारू प्रत्येकी ९० ml च्या सिलबंद १००
बॉटल नुसार १५ बॉक्समध्ये एकूण १५०० बॉटल की अं १,५०,००० रू

२) दारु वाहतुकीकरीता वापरण्यात आलेली जुनी वापरती सिल्व्हर हंगाची स्वीष्ट डिझायर कपणीची कार क.MH 02 BY1099 कि अं.४,००,०००रू असा एकूण कीमत ५,५०,००० रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नमूद आरोपीतांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५
अ.८३ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.

अवैध दारू विक्री व वाहतुकीवर आळा घालण्यासंबंधाने ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनतर्फे विशेष मोहीम सुरू असून चंद्रपूर जिल्हयात दारूबंदी उठल्यानंतरही ब्रम्हपुरी तालुक्यातील ग्रामीण परीसरात तसेच ब्रम्हपूरी येथून गडचिरोली जिल्हयामध्ये लपूनछपून अवैध दारू वाहतूक होत असल्याची माहीती समोर येत असल्याने पो.स्टे ब्रम्हपुरी पोलीसांकडून सतत छापेमारी कारवाई करणे सुरू आहे.

मागील आठवडयात पो.स्टे ब्रम्हपुरी येथे एकूण १० दारूबंदीच्या केसेस नोंद केल्या गेल्या असून त्यामध्ये ग्राम नान्होरी येथे मिळून आलेली देशी दारूचे अवैध १३ बॉक्सची कारवाई सुद्धा समाविष्ठ असून पो.स्टे ब्रम्हपुरी येथे सप्टेंबर २०२१ हया महीण्यात दारूबंदीच्या एकूण ३६ केसेस करण्यात आल्या असून त्यातून एकूण ८,२५,१२५ चा अवैध दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.