आंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीव दिवसानिमित्त डॉ. प्रकाश एम. हलामी यांचे व्याख्यान…

24

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.1ऑक्टोबर):-डॉ. प्रकाश एम. हलामी हे गडचिरोली जिल्ह्यातील (मु. खरमतटोला, ता. कुरखेडा) रहिवाशी असून सद्या ते सी एस आर आय-सी एफ टी आर आय म्हैसूर, येथे मुख्य वैज्ञानिक व विभाग प्रमुख, सूक्ष्मजीव व किण्वन तंत्रज्ञान विभाग, येथे कार्यरत आहेत. सेन्ट झव्हिअर कॉलेज, रांची विद्यापीठ, येथे Microbiolgy Society Of India, Dr. Microbiologist & Microweb Club यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय वेबिनार आयोजित करण्यात आला होता, यामध्ये ते प्रमुख वक्ते होते.

सर्वसामान्यांना सूक्ष्मजीव विज्ञान, विषाणू शास्त्र या विषयी जाणीव – जागृती व्हावी या उद्देशाने 2017 पासून जगामध्ये 17 सप्ते. हा दिवस आंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीव दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. Microbiolgy Society Of Indian ही भारतातील महत्वाची वैज्ञानिक संघटना असून वेगवेगळ्या जिवाणू तसेच विषाणू पासून होणारे जे आजार आहेत याविषयी जागृतीचे काम करते.

कोरोना आणि त्यासारखे संसर्गजन्य रोग आहेत त्यांचा प्रतिबंध कसा करावं? हा एक शास्त्रज्ञांना आव्हानच आहे कारण आतापर्यंत जवळपास देशात कोरोनाने पाच लाख लोक बळी पडले असून 33 कोटींच्या वर लोकांना लागण झालेली आहे. आतातरी लोकांनी सतर्क राहून कोरोनाचे नियम पाळायला पाहिजे तेव्हाच आपण कोरोनाला पूर्णपणे देशातून हद्दपार करू शकतो, असे प्रतिपादन डॉ. प्रकाश एम. हलामी यांनी केले आहे.
सूक्ष्मजीव च्या विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आपल्या जीवनातील त्यांचे महत्त्व ओळखण्यासाठी हा दिवस देशात साजरा केला जातो. सूक्ष्मजीव हा एक जीवच असून याविषयी सामान्य लोकांनाच नाही तर शास्त्रज्ञांना सुद्धा याविषयी माहिती नव्हती. सूक्ष्मजीव यामध्ये सर्व एकपेशीय जीवांचा समावेश असतो. तसेच विषाणू हे त्यांच्या वाढीसाठी दुसऱ्या सजिवावर अवलंबून असतात, ते जर मानवामध्ये असल्यास त्यामध्ये ते आजार निर्माण करीत असतात आणि त्यामुळे आपण योग्य ती काळजी घेऊ शकलो नाही, आणि त्याचाच फायदा कोरोना ने घेतला व संपूर्ण देशात हाहाकार माजविला. पण आता परिस्थिती बदलली आहे.

सर्वसामान्यांना विषाणू, जिवाणू, सानिटाईजर तसेच मास्क वापरण्याचे फायदे याबद्दल बरीच जाणीव झालेली आहे. त्यामुळें येदा कदाचित भारतात तिसरी लाट आल्यास ती दुसऱ्या लाटेसारखी भयंकर नसणार, असा विश्वासही डॉ. हलामी यांनी वेक्त केला.तसेच डॉ. हलामी यांच्याकडे संस्थेची कोविड सेंटर ची पर्यवेक्षक अधिकारी म्हणून अतिरिक्त जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या केंद्रामार्फत आतापर्यंत पाचलाखांच्या वर लोकांची तपासणी करण्यात आलेली आहे.