✒️धरणगाव प्रतिनिधी(पी. डी. पाटील सर)

धरणगांव(दि.1ऑक्टोबर):- बहुजन क्रांती मोर्चा, धरणगांव युनिटच्या वतीने मा.नायब तहसिलदार प्रथमेश मोहोड यांना अनमोल ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला.धरणगाव येथून चांदुरबाजार येथे प्रशासकीय बदली झालेले आमच्या धरणगावचे कर्तबगार नायब तहसिलदार मा. प्रथमेश मोहोड यांनी कोरोना काळात कोव्हीड केंद्राची पूर्ण जबाबदारी सांभाळीत शहर व परिसरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची व जनतेची अतिशय प्रामाणिकपणे सेवा केली.

तसेच, महत्त्वपूर्ण मार्गदर्शनही केले होते. मा.मोहोड साहेब ना. तहसीलदार पदांवर असताना प्रशासनाचे महसूल विभाग असो निवडणूक शाखा विभाग असो असे वेगवेगळ्या विभागात त्यांचा कामाचा हातखंडा होता. सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन अतिशय प्रामाणिकपणे मोहोड साहेब काम करीत असे. असे धरणगावचे लाडके अधिकारी प्रथमेश मोहोड साहेब यांची चांदूर बाजार येथे बदली झालेली आहे. म्हणून धरणगाव शहरातील बहुजन क्रांती मोर्चा, धरणगाव युनिट च्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ व अनमोल ग्रंथ देऊन निरोप देण्यात आला. यावेळी साहेबांना धरणगाव सोडतांना डोळे पाणावले होते. मी धरणगावकरांना कधीही विसरू शकणार नाही. तसेच, मी काम करीत असताना धरणगावकरांनी खूपच सहकार्य व प्रेम दिलंय, असे आपसूक उद्गार प्रथमेश मोहोड यांनी केले.

याप्रसंगी ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य तसेच बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ, भारत मुक्ती मोर्चाचे राज्य महासचिव मोहन शिंदे , बामसेफचे जिल्हा महासचिव हेमंत माळी, छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील, बामसेफचे तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील, भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष गौतम गजरे, प्रोटॉन शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील देशमुख, बुद्धिष्ट इंटरनेशनलचे तालुकाध्यक्ष निलेश पवार, राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरख देशमुख, महासचिव आकाश बिवाल तसेच सामाजिक कार्यकर्ते दिनेश भदाणे व बहुजन क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED