🔹शेतकरी राजा मात्र आर्थिक मंदीत

✒️तलवाडा प्रतिनिधि(शेख आतिख)

तलवाडा(दि.2ऑक्टोबर):-निसर्गाने मारले तर नितीने मारु नये आशी एक म्हण प्रचलीत आहे. पण सध्याची नीती ही राजकारणात गुंग तर मस्तवाल राजकारणी सत्तेच्या मोहजालात धुंदीत वावरत आसतांना शेतकरी राजा मात्र आर्थिक मंदीत सापडल्याचे चित्र सर्वत्र पाहन्यास मिळत आहे.

यंदाचा पावसाळा राज्यभरात शेतकरी राजा व हातवर जगना-या मजुरांसाठी आर्थिक मंदीचे सावट घेऊन आलेला आसतांना या आसमानी संकटातुन शेतकरी राजा व मजुर वर्गाला सावरन्या एैवजी पाहणी दौ-याच्या चावट चाळ्यातुन फोटो शेषनवर लाखो रुपयाचा चुरडा ही राजकीय मंडळी करत असुन निर्लज्जम सदासुखी या ऊक्ती प्रमाणे ही राजकीय मंडळी तातडीने ऊपाय योजना कार्यनिर्वीत करन्या एैवजी निसर्गरम्य वातावरणाचा दौ-याच्या निम्मीताने आनंद घेत फिरत आसल्याच्या प्रतिक्रिया जानकारातुन एैकन्यास मिळत आहेत.

प्रतेक जिल्हे. तालुके. व गाव वाइज जिल्हाधिकारी, तहसीलदार, मंडळ आधिकारी, तलाठी कार्यनिर्वीत आसतांना व शेतकरी राजाचे प्रतेक महसुल मंडाळात सर सकट नुकसान झालेले आसतांना पाहणी दौ-याची गरजच. काय आसा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत असुन दौ-याचा खर्च जर तातडीने राजकीय मंडळीने थोड्याफार प्रमाणातका होईना वाटप केला आसता तर बुडत्याला काडीचा आधार प्रमाणे शेतकरी राजाला दिलासा मिळाला आसता. तदनंतर प्रतेक मंडाळातील नुकसानीची सर सकट मदत अपेक्षित होती व आहे. परंतु सत्तेच्या धुंदीत आसना-या मस्तवाल राजकारणी मंडळी व गाव पुढा-यांना शेतकरी राजाची आर्थिक मंदीची काय तमा व फिकर!

महाराष्ट्र, लाइफस्टाइल
©️ALL RIGHT RESERVED