अन्याय अत्याचार विरुद्ध पेटून उठा- मा. दादासाहेब शेळके (राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना)

28

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका प्रतिनिधीउमरखेड)मो:-9823995466

महागाव(दि.2ऑक्टोबर):-मौजे करंजी तालुका महागाव येथे भीम टायगर सेना सलग्न भीम टायगर महिला आघाडी शाखा फलकाचे अनावरण मा. दादासाहेब शेळके राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात भीम टायगर सेना सलग्न भीम टायगर महिला आघाडी च्या नाम फलकाचे अनावरण करून तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून केला.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.दादासाहेब शेळके यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच प्रमुख पाहुणे म्हणून गौतमदादा वाठोरे (प्रवक्ता नांदेड), राष्ट्रपालदादा सावतकर (नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख), सिध्दार्थ दिवेकर (जिल्हाअध्यक्ष सोशल मीडिया यवतमाळ तथा शहराध्यक्ष उमरखेड), भय्यासाहेब पाईकराव (पत्रकार महागाव), लिलाबाई हटकर (महिला आघाडी तालुका अध्यक्ष उमरखेड) हे उपस्थित होते.व यांचे सुद्धा शाल व पुष्पगुच्छ देऊन महिला आघाडी च्या हस्ते सत्कार केला.यावेळी अध्यक्षीय भाषणात मा.दादासाहेब शेळके हे म्हणाले की, महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत चालले महिलांवर होणारे अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध पेटून उठा…!

कारण आपला दिवस ही नाही तर रात्र ही वयऱ्याची आहे.
म्हणून जागरूक राहा..! सतर्क राहा..! भीमाच्या लेकीनो आता शांत बसायचं नाही कारण जोपर्यंत या देशात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान आहे. तोपर्यंत आपण जिवंत आहोत.असे अनेक उदाहरणे सांगून महिलांमध्ये एक नवी ऊर्जा निर्माण करण्याचे काम मा.दादासाहेब शेळके यांनी अध्यक्षीय भाषणात केले.

यावेळी नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. रत्नाबाई विठ्ठल बहादूरे, उपाध्यक्षा सौ.ज्योती संतोष वाढवे सचिव सौ. रंगुबाई देविदास धुळे तालुका कार्यकरणी सौ. सुनिता गौतम इंगोले, सौ.पुष्पाताई प्रकाश लोणकर, सौ. रत्नमाला सदाशिव पाईकराव इत्यादी सर्व महिला सदस्या,पुरुष व तरूण मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भय्यासाहेब पाईकराव यांनी केले तर आभार सौ. पुष्पाताई लोणकर यांनी मानले.