राजकीय दबावाखाली कोरपना च्या नायब तहसीलदाराचा बेकायदेशीर आदेश

33

🔹मंडळ अधिकारी पचारे यांची दबंगगीरी

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.2ऑक्टोबर):-कोरपना येथिल शेतकरी शेख रसूल व इतर ६ यांच्या शेतातून सर्व्हे नंबर ७४ ला जाण्याचा रस्ता काढण्यासाठी म्हणून उभ्या पिकातून जेसीबी व नगरपंचायत सफाई कामगार यांना घेऊन शेख अहमद यांच्या शेतातील उभे कपाशीचे पिक नष्ट करण्याचा प्रकार व नुकसान होत असल्याचे भ्रमणध्वनी द्वारे पत्रकार मोहब्बत खान यांना महाराष्ट्र २४ न्यूज डिजिटल मीडिया यांना सूचना मिळाताच पत्रकार मोहब्बत खान यांनी तात्काळ मोक्यावर जाऊन परिस्थितीचे अवलोकन करीत व्हिडिओ शूटिंग फोटोशूट करीत असताना, बातमी संकलन करण्याकरिता पत्रकार मोहब्बत खान हे मंडळ अधिकारी पचारे यांना करत असलेल्या कार्यवाहीचे आदेश प्रत बाबत विचारणा करत असताना उभ्या पिकातून रस्ता काढण्याची कारवाई चे आदेश आहेत काय? असा सवाल विचारपूस करीत असता अचानक नितीन बावणे, प्रफुल बावणे, रामा पंधरे व इतर पाच सहा नगरपंचायत चे सफाई कामगार मागून येऊन कुऱ्हाड व काट्या घेऊन पत्रकार यांच्यावर हल्ला करण्याकरिता धावले.

व नितीन बावणे यांच्या म्हणण्यावरून रामा पंधरे यांनी पत्रकाराला कमरेवर चिखलाने भरलेली लाथ मारली त्यावेळी तेथे उपस्थित असलेले पोलीस त्याठिकाणी धावत आले व बचाव करीत बाजूला केले मात्र पत्रकाराला बेकायदेशीर कारवाई करत असताना व्हिडिओ शूटिंग व फोटो काढण्यास मनाई करण्यामागे मंडळ अधिकारी व बावणे यांचा हेतू वेगळाच असल्याचे दिसून आले. येते एका अल्पभूधारक शेतकऱ्यांवर अन्याय करून भुमापन नकाशा मध्ये नसताना चुकीचा पंचनामा करून एखाद्या गरीब शेतकऱ्यांच्या अन्यायाला वाचा कोडने चुकीचे आहे का? असा सवाल यावेळेस पत्रकार मोहब्बत खान यांनी उपस्थित केला. सदर प्रकरण हे महसूल अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे व बावणे परिवाराच्या दबंगरी मुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकाराचे मुस्कट दाबणी करण्याचा व कुराड व लठ्याकाठ्या घेऊन गुंडशाही प्रवृत्तीच्या लोकांनी एका पत्रकाराचा आवाज दाबण्याच्या विरोधात पत्रकार मोहब्बत खान यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून गैरअर्जदार नितीन बावणे व त्यांच्या सहकाऱ्यांवर अपराध क्रमांक ०१३७ दि. कोरपना येथिल पोलीस प्रशासनाने २७/९/२१ तुला भारतीय दंड संहिता १८६० चे कलम भा द वि २९४,३२३,५०६,३४ अन्वय गुन्हा दाखल केला आहे.

गैरअर्जदार व त्यांचे सहकारी हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजय चिंतामण बावणे यांची मुलं असून सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहे. दि. २७/९/२१ रोजी मंडळ अधिकारी पचारे, व महिला तलाठी,पोलिस शिपाई ,दोन महिला पोलीस अधिकाऱ्यांसमक्ष काही गाव गुंडासह अर्जदाराचा शेतातून जेसीबी चालविण्यात आली विशेष म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १४३ अन्वये माननीय तहसीलदार कोरपना यांचे महसूल कार्यालयाने दि. ०९/०९/२०२१ रोजी एक आदेश पारित केला. सदर आदेशाची प्रत अथवा माहिती राजकीय वरदहस्त वापरून गैर अर्जदाराने अर्जदारास होऊ दिली नाही.

हा आदेश राजकीय दबावाखाली एका जबाबदार अधिकाऱ्याचा बेकायदेशीर आदेश असल्याचे स्पष्ट होते.
गैरअर्जदार यांचेवर यापूर्वी देखील पत्रकार मोहब्बत खान यांनी एका विकास कामाबद्दल गैर व्यवहार झाला असल्यासंदर्भात बातमी प्रसारित केल्यामुळे विजय बावणे यांनी भ्रमणध्वनीद्वारे पत्रकाराला मारण्याची धमकी देऊन थेट पत्रकाराच्या घरी जाऊन मारहाण देखील केली होती त्यामुळे विजय बावणे सह पाच इतरांवरही कोरपना पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल झाले होते.

अपराध क्र. ३६४ भा द वि १४७, १४८,१४९,५०७,४५२,२९४,५०६,३२३ अन्वये गुन्हा दाखल केला होता. यांचे गैरव्यवहार भ्रष्टाचार उघडकीस करणाऱ्यांवर दमदाटी करण्याचा प्रकार हल्ला करण्याचा प्रकार पहिला नसून वारंवार होत आहे यामुळे नितीन बावणे व त्यांचे सहकारी यांच्या गुंडशाही प्रवृत्तीमुळे गावात सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. यांच्या अशा दहशतीच्या वातावरणामुळे नागरिकांवर याआधी अन्याय झाला ते नागरिक भीतीपोटी समोर येतं नाहीत. ज्या तालुक्यामध्ये जनतेचा लोकप्रतिनिधी/पत्रकारच जर सुरक्षित नसेल तर त्या तालुक्‍यातील नागरिकांची काय अवस्था होत असेल?अशी गंभीर बाब पत्रकार मोहब्बत खान यांनी व्यक्त केली.