महिला मुक्ती मोर्चा चंद्रपूर जिल्हा तथा शहर तर्फे महात्मा गांधीच्या पुतळ्याला अभिवादन

31

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.2ऑक्टोबर):-महिला मुक्ती मोर्चा चंद्रपूर जिल्हा तथा शहर तर्फे महात्मा गांधीच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

महात्मा गांधी यांच्या विचारांचा वारसा घेऊन संघटनेचे कार्य विस्तारित करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

यावेळी ऍड मदन भैसारे जिल्हा विधी सल्लागार, अजय गोवर्धन जिल्हा महासचिव, मारोती आत्राम जिल्हा सहसचिव, शहर अध्यक्ष श्वेता फंदी, महासचिव कीर्तीताई गुरूनले, संघटक प्रतिभा मडचापे , वैशाली शेंडे सह संघटक सीमा वानखेडे व संगीता मामिलवार उपस्थित होते