स्काॕर्पिओ ऐका झाडावर धडकली अपघातात की घातपात एक तरुणी जागीच ठार

27

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.2ऑक्टोबर):-शहारा पासून दाह किलोमीटर अंतरावर असलेल्या मासोळी प्रकल्प या मासोळी प्रकल्पाकडे जाणारी एक स्काॕर्पिओ ऐका झाडावर धडकली व गाडीत आसलेली २० वर्षीय तरुणी जागीच ठार झाली आणि दुसरी तरुणीही जखमी झाल्याची घटना दिनांक 30सप्टेंबर रोजी घडली असून या दोघीही मासोळी प्रकल्पाचा निर्जन ठिकाणी गाडीतुन जात होत्या की जबरदस्ती नेल्या जात होत्या अशी जोरदार चर्चा शहरात रंगली आसून या घटनेचा गुन्हा राञी उशिरा नोंदविण्यात येऊन ऐकोणीस वर्षीय चालकास अटक करण्यात आली असून शहरात मागील अनेक दिवसापासून तरूण वर्गाची टोळी शहरातील अल्पवयीन मुलीस प्रेमाचा जाळ्यात ओढून गैर फायदा घेण्याचे प्रकार सातत्याने घडत आहे.अनेक चांगल्या घरच्या मुली या टोळीतील तरूणाचा जाळ्यात फसलेल्या आहेत पण इभ्रतीसाठी कोणीही पुढे येऊन आज पर्यत तक्रार केलेली नाही.हा तोच प्रकार आसल्याची जोरदार चर्चा शहरात होताना दिसत आहे.

शहरातील २० वर्षीय तरुणी व १८ वर्षीय तरुणी या दोघीही शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या निर्जनस्थळ आसलेल्या मासोळी प्रकल्पावर एम.एच.22 एएम 8100 या साॕर्पिओ मधुन जात होत्या की जबरदस्ती नेल्या जात होत्या याचे तसेच ही गाडी कोणाची आहे हे गुढ गुलदस्त्यातच आहे भरधाव वेगात मासोळी प्रकल्पाकडे जाणारी स्कारपीओ गाडी सांगळेवाडी गावाजवळ झाडाला धडकली आणी गाडीत आसलेली २० वर्षीय तरुणी जागेवरच मृत्युमुखी पडली तर अठरा वर्षीय तरुणी जखमी झाली अपघात होताच सांगळेवाडीतील गावकऱ्यांनी धाव घेतली आसता गाडीत केवळ या दोघीच आढळून आल्या गावक-यानी गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दोघीना आणले.

२० वर्षीय तरुणीस तपासले आसता डॉक्टराने मृत घोषित केले तर १८ वर्षीय तरुणीस शहरातील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारार्थ परभणी येथे पाठवण्यात आले सदरील तरूणी किरकोळ जखमी आसताना तिला परभणी येथे उपचारासाठी पाठविण्यात आले नाही.सदरील स्कार्पिओ मध्ये चालका शिवाय इतर व्यक्ती कोण होत्या याचा तपास लावणे गरजेचे आहे.अब्दुलाबीन अद्रीसअली जिलानी उर्फ चाऊस या 19 वर्षीय चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले रात्री उशिरा मणुष्य सदोष वधाच्या गुन्हाची नोंद करण्यात आली.सदरील प्रकरणात पोलिस अधिक्षकानी लक्ष देऊन गुन्हाच्या मुळा पर्यत जाऊन शोध घेऊन सत्य उजेडात आणावे अशी मागणी जनतेत होताना दिसत