बोरगाव राज्य महामार्गावर मुद्देमालासह लाखो चा गुटखा जप्त- वाहन चालक चक्क नाशिकचा!

29

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

सापुतारा(दि.2ऑक्टोबर):-बोरगाव राज्य
महामार्गावर पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीच्या दरम्यान गुजरात राज्यातून वाहतूक करणा-या वाहान तसेच तंबाखू जन्य गुटखा जप्त,लाखोंच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
नाशिक -वणी-सापुतारा सुरगाणा पोलिस अंतर्गत बोरगाव पोस्ट च्या पोलिस कर्मचारी सह महाराष्ट्र गुजरात सिमेलगत ठाणापाडा होटल साई श्रद्धा समोर, केलेल्या धडक कारवाईत

२३ लाख रुपये किंमतीचा गुटखा तर सुमारे दहा लाख रुपये किंमतीचा आयशर टेम्पो असा एकूण ३३ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षक सचिन पाटील अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगळे , कळवण उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड , यांच्या अध्यक्षतेखाली ता.३० संप्टेबर रोजी ठाणापाडा ,हतगड हद्दीतील पोलिस तपासणी नाक्यावर सुरगाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक निलेश बोडके, पोलिस पराग गोतुरणे, हवालदार जे.डी. ढुमसे, संतोष गवळी यांनी राज्य महामार्गावर अंमली पदार्थांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळताच त्यानी पहाटेच्या सुमारास सापळा रचला. स्वराज महिंद्रा कंपनीच्या टेम्पो क्र. एम. एच .१५ एच. एच .२४१६ या आयशर टेम्पोची तपासणी करत असतांना पोलिस कर्मचारी यांनी चालकाला टेम्पो मध्ये काय आहे ?

अशी विचारपूस केली असता चालक संदिप गायकवाड यांची घाबरगुंडी उडाली असता तो उडवा उडवीचे उत्तर देऊ लागल्याने वाहनांची कसून तपासणी केली असता हि बाब उघडकीस आली.१ ऑक्टोबर रोजी अन्न व सुरक्षा प्रशासनचे अधिकारी,अन् व सुरक्षा गुप्त वार्ता अधिकारी गोपाल कासार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यात गाडीची तपासणी गेली असता गाडीमध्ये विमल पान मसाला तंबाखूजन्य गुटका मसाल्याच्या 66 गोण्या व त्यात मिक्स करण्याच्या 34 तंबाखू 24 पान मसाला अशा लाखो रुपयांचा मुद्देमाल आढळून आला याप्रकरणी चालक संदीप गायकवाड वय 31 राहणार मखमलाबाद नासिक साथीदार कुणाल वय 24 राहणार खरडे तालुका देवळा येथील या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील पोलीस निरीक्षक संदीप कोळी आधी करीत आहे