सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढा उभा करु-ऍड. विवेक घाटगे यांचे प्रतिपादन

25

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.2ऑक्टोबर):- सर्वसामान्य लोकांना जाणिवपूर्वक अडचणी आणि अडथळा निर्माण करणाऱ्या इथल्या व्यवस्थेला आपण सडेतोडपणे जाब विचारायला हवा. त्यांच्या न्याय हक्कासाठी आपण मोठा निर्णयात्मक पर्यायी लढा उभा केला पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य ऍड. विवेक घाटगे यांनी केले. ते निर्मिती लिगल कन्सल्टन्सीच्या ऑफिसच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.कोल्हापूर येथील आदित्य सभागृह येथे निर्मिती लिगल कन्सल्टन्सीच्या ऑफिसचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.

यावेळी बोलताना ऍड. घाटगे म्हणाले, शासनाने सर्व महामानवांच्या जयंत्यांच्या सुट्या बंद केल्या पाहिजेत. शिवाय त्या दिवशी शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये सुरु ठेवून महापुरूषांच्या विचारांचा जागर करायला हवा.यावेळी बोलताना कोल्हापूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. प्रकाश मोरे म्हणाले, वकिलांनी निवाड्यापेक्षा न्यायावर अधिक भर दिला पाहिजे. वकिलांनी नेहमीच आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने काम करायला हवे.शहाजी लाॅ. महाविद्यालयाचे प्रा. श्रीपाद देसाई म्हणाले, वकिलांनी कायम सत्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे आवश्यक आहे.

तर ऍड. कृष्णा पाटील म्हणाले, निर्मिती कन्सल्टन्सीच्या माध्यमातून सामन्य माणसाच्या अडचणी दूर केल्या जातील. या नव्या प्रयोगामुळे कायदा आणि लोक यातील अंतर कमी होऊन ते अधिक सुसंवादी होईल.या कन्सल्टन्सीमध्ये ऍड. अकबर मकानदार, ऍड. अधिक चाळके, ऍड. टी. जी. मुल्लाणी, ऍड. करुणा मिणचेकर यांचा समावेश आहे.

यावेळी ऍड. एस. एस. खोत, ऍड. अरुण पाटील, ऍड. सुनील देशपांडे, ऍड. अनिकेत डोंबे, हुसेन भालदार आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऍड. अधिक चाळके यांनी केले तर स्वागत व प्रस्तावना ऍड.अकबर मकानदार यांनी केले. आभार ऍड. करुणा मिणचेकर यांनी मानले.