गांधी जयंतीचे औचित्य साधून दिव्यांग मतदार जनजागृती अभियान राबविणार – राजेंद्र लाड

23

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.3ऑक्टोबर):-भारत हा लोकशाही प्रधान देश आहे.जगातील सर्वात शस्वी लोकशाही म्हणून आपल्या भारत देशाकडे पाहिले जाते.ही लोकशाही यशस्वी करण्यामागे येथील नागरिकांचा म्हणजे मतदारांचा मोलाचा सहभाग आहे.याकामी दिव्यांगही मागे राहू नयेत यासाठी दिव्यांगांचाही लोकशाही बळकट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाटा असावा यासाठी भावी काळात होणाऱ्या निवडणूकीत दिव्यांगांचे मोठ्या प्रमाणात मतदान व्हावे.

यासाठी महात्मा गांधी जयंतीपासून (दि.२ आॕक्टोबर २०२१ ते दि.३१ आँक्टोबर २०२१) बीड जिल्ह्यात दिव्यांग मतदार जनजागृती अभियान बीड चे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा,उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव,मुख्यकार्यकारी अधिकारी अजित पवार,समाजकल्याण अधिकारी रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविणार असल्याची माहिती दिव्यांग मतदार नोंदणी बीड जिल्हा राजदूत राजेंद्र लाड यांनी दिली आहे.मतदान करणे हा प्रत्येक नागरिकांचा पवित्र हक्क आहे.लोकशाही प्रबळ,मजबूत व भक्कम करण्यासाठी प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजविणे आवश्यक आहे.याकामी दिव्यांग मतदारही मागे राहता कामा नये.बरेच दिव्यांग बांधव असे आहेत की,ते मतदानापासून वंचित राहतात कारण त्यांना चलन – वलनासाठी अडीअडचणी येत असतात.यासाठी आता निवडणूक विभाग त्यांना मोठ्या प्रमाणात सुविधा पुरविणार आहे.

मी एकट्याने मतदान नाही केलं तर काय फरक पडतो असा बऱ्याच दिव्यांगांमध्ये न्युनंगड तयार झालेला असतो त्यामुळे ते मतदान प्रक्रियेपासून वंचित राहतात.त्यांना मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सामील करण्यासाठी व त्यांच्यातील न्युनंगड दूर करण्यासाठी या दिव्यांग मतदार जनजागृतीचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून यासाठी वर्तमानपत्रे,व्हाॕटस्अप,फेसबुक, इंटरनेट व प्रत्यक्ष कोरोना चे सर्व नियम पाळून गाठीभेटी घेवून दिव्यांग मतदार जनजागृतीचा प्रचार व प्रसार करणार आहे.तसेच निवडणूक आयोगाच्या स्पष्ट निर्देशानुसार दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून वगळण्यात आलेले असून ते सर्व कर्मचारी दिव्यांग बांधव आपल्या मतदान केंद्रावरील दिव्यांग बांधवांना मतदान नोंदणी करण्यास प्रवृत्त करणार असून त्यांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याच्या दृष्टीने प्रचार व प्रसार करणार आहेत.

यासाठी दिव्यांग कर्मचारी संघटना शाखा बीड चे सर्व पदाधिकारी तसेच बीड जिल्ह्यातील दिव्यांगांच्या स्वंयसेवी संस्था,संघटना,दिव्यांग जेष्ठ व्यक्ती यांचीही मदत मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार करण्यासाठी घेणार आहे.देशहिताचे भान,दिव्यांगांचे १०० टक्के मतदान हे ब्रिद घेवून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मतदार जनजागृतीचे काम करणार असल्याचे शेवटी राजेंद्र लाड यांनी म्हटले आहे.