महात्मा गांधी यांचे विचारच देशाला तारू शकणार -खासदार बाळूभाऊ धानोरकर

25

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.3ऑक्टोबर):-महात्मा गांधी यांना भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार म्हटले जाते. त्यामुळे त्यांना राष्ट्रपिता असा दर्जा देण्यात आला आहे. आपल्या अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. महात्मा गांधी केवळ अट्टल राजकारणीच नव्हते, तर जीवनाच्या विविध पैलूवर त्यांचा चांगलाच प्रभाव होता. ते चांगले समाज सुधारक, कुशल अर्थज्ज्ञ होतेच . याबरोबरच त्यांचा उत्कृष्ट जनसंपर्क होता. आजघडीला गांधीजींच्या विचारच देशाला तारू शकणार आहे. त्यामुळे प्रत्येकांनी गांधीजींचे विचार अंगिकरावे, असे आवाहन खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी केले.

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आयोजित जयंती कार्यक्रम खासदार धानोरकर बोलत होते. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी, गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात महात्मा गांधी आणि देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी काँग्रेसचे प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, कामगार नेते के. के. सिंग, महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष सुनीताताई अग्रवाल, महिला काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष चित्राताई डांगे, नगरसेवक प्रशांत दानव, नगरसेविका सकीना अन्सारी, नगरसेवक नीलेश खोब्रागडे, नगरसेविका वीणा खनके, नगरसेविका ललिता रेवल्लीवार, रमीज शेख, सुनील पाटील, अनुसूचित जाती विभागाच्या अनुताई दहेगावकर, शालिनी भगत, सेवादल जिल्हाध्यक्ष स्वाती त्रिवेदी, राजेश अडूर, कुणाल चहारे, पप्पू सिद्दीकी, प्रसन्ना शिरवार, पितांबर कश्यप, बलवीर गुरम, सुरेश गोलेवार, कुणाल रामटेके, राजू वासेकर, धर्मेंद्र तिवारी, राहुल चौधरी, वंदना भागवत, चंदा वैरागडे, शिल्पा आंबटकर, सागर वानखेडे, अंकुश तिवारी, कासिफ अली, एजाज़ भाई, सुनंदा धोबे, राज यादव, बंडोपंत तातावार, प्रकाश देशभ्रतार, सागर वानखेडे, सलमान खान, सूर्य अड़बोले, रिषभ दुपारे, गौस खान, उषा मेश्राम, कल्पना गिरडकर, अजय मोरे, दुशांत लाटेलवार, रवी रेड्डी यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.