✒️अमोल उत्तम जोगदंडे(विशेष प्रतिनिधी)

उमरखेड(दि.3ऑक्टोबर):-सततच्या अतिवृष्टीमुळे ईसापुर धरणातून अचानक पाण्याचा विसर्ग केल्यामुळे शेतकऱ्यांची शेतजमीन व शेतातील कापूस सोयाबीन तूर ऊस व इतर पिकाची अतोनात नुकसान झाल्यामुळे तत्काळ पंचनामे करून नुसकान भरपाई म्हणून सरसकट प्रति हेक्टर रुपये 50000 देणे बाबत व अतिवृष्टीमुळे घराची व शेतातील विहिरी ची पडझड होऊन तसेच गुरेढोरे पुरांमध्ये वाहून गेल्याने व दगावल्या मुळे तात्काळ नुसकान भरपाई देणे बाबत माननीय तहसीलदार साहेब उमरखेड यांना शिवसेना तालुका शहर युवा सेना यांच्या वतीने निवेदन सादर केले.

याप्रसंगी शिवसेनेचे संपर्क प्रमुख श्री चितंगराव कदम सर उपजिल्हाप्रमुख एडवोकेट बळीराम मुटकुळे साहेब तालुका प्रमुख सतीश भाऊ नाईक उमरखेड शहर प्रमुख नगरसेवक तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री संदीप भाऊ ठाकरे पंचायत समिती सदस्य गजानन सोळुंके पंचायत समिती सदस्य गोपिचंद दोडके युवा सेना तालुकाप्रमुख कपिल भाऊ पाटील तालुका संघटक प्रमुख श्री संतोष भाऊ जाधव युवासेना प्रमुख गोपाल भाऊ कलाने श्री विकास मुंलगे उपजिल्हाप्रमुख ओबीसी सेल, अविनाश भाऊ कदम उपजिल्हाप्रमुख युवा सेना विजय कांबळे नाना राव कदम शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख देवानंद भारती तसेच शिवसेनेचे पदाधिकारी तसेच शिवसैनिक उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED