लोकशाही न्युज चॅनल कडून दिला जाणारा मराठवाडा रत्न पुरस्कार यावर्षी परळी ची कन्या ज्योती भिमाशंकर चौंडे यांना प्रदान करण्यात आला आहे

30

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी(दि.3ऑक्टोबर):-अतिशय दुर्गम भागात प्राथमिक शिक्षिका म्हणून काम करताना जिल्हा परिषदेच्या शाळेचा चेहेरा मोहरा बदलून शेतकरी मजूर वर्गाच्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम ज्योती ताई अतिशय निस्सीमपणे करतात. गावातील लोकांची जनजागृती करून लोकवाटा जमा करून त्यांनी शाळा रंगरंगोटी व डिजिटल केली तसेच 1 ली पासून सेमी इंग्रजी माध्यम सुरू करून गावातून तालुक्याला जाणारे विद्यार्थी गावातच जिल्हा परिषदेच्या शाळेत मोफत पण दर्जेदार शिक्षण घेतील यासाठी प्रयत्न केले.शिवाय शिक्षक म्हणून नोकरी करत असतांनाच विधवा पूर्वसन व बालविवाह प्रतिबंध ह्या सामाजिक कार्यातही त्या अग्रेसर असतात. त्यांच्या या कर्तुत्वाला लोकशाही न्युज चॅनल ने झळाळी देऊन दि. 26 सप्टेंबर 2021 रोजी औरंगाबाद येथे रामा इंटरनॅशनल हॉटेल मध्ये त्यांचा सन्मान केला.

या कार्यक्रमास मा. आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे, माजी मुख्यमंत्री श्री अशोक चव्हाण तसेच मराठी अभिनेता मंगेश देसाई यांच्या उपस्थितीत होते.ज्योती ताई आपल्या परळी येथील रहिवासी श्री भिमाशंकर अप्पा चौंडे यांच्या जेष्ठ कन्या आहेत. सम्पूर्ण आठवड्यातून शिक्षण क्षेत्रात मराठवाडा रत्न म्हणून पुरस्कार मिळाल्यामुळे परळी च्या कन्येचे सर्वत्र कौतुक होत आहे. ज्योती ताई जि.प.प्राथमिक शाळा गोजेगाव,ता.औंढा जि.हिंगोली येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.