पाळा येथे शारदीय नवरात्र अखंड ज्योत महोत्सवाचे जगतगुरु राजेश्वर माऊली यांच्याहस्ते उद्घाटन !

30

🔸श्री क्षेत्र पाळा येथील नवरात्र महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन !

✒️मोर्शी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मोर्शी(दि.3ऑक्टोबर):-श्री क्षेत्र पाळा येथे जगतगुरु रामराजेश्वराचार्य श्री संत सच्चीतनंद बालयोगी राजेश्वर माऊली ट्रस्ट पाळा यांच्या प्रेरणेने पाळा येथे श्री शारदीय नवरात्र अखंड ज्योत महोत्सव जगतगुरु राम राजेश्वराचार्य राजेश्वर माऊली, आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वयंभू श्री महालक्ष्मी धाम कमला माता मंदिरामध्ये अखंड ज्योत प्रज्वलित करून शारदीय नवरात्र अखंड ज्योत महोत्सवाचे उदघाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले.जगतगुरु राजेश्वर माऊली यांनी मुळात प्रमाणित भाषेचे संपूर्ण श्रेय विदर्भाला आहे. विदर्भातील प्राचीन साहित्याचे कौतुक जगतगुरु राजेश्वर माऊली यांनी केले. अनेक प्राचीन ग्रंथांमधून विदर्भ हे मराठीच्या उदयाचे स्थान असल्याचे सिद्ध झाले आहे’ विदर्भातील सोपी भाषा लुप्त होण्याच्या मार्गावर असल्यामुळे विदर्भातील भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात करा असे प्रतिपादन जगतगुरु श्री रामराजेश्वराचार्य राजेश्वर माऊली यांनी यावेळी केले सोबतच सामाजिक क्षेत्रात समाजकार्य करण्यासाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.

यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांचा राजेश्वर माऊली ट्रस्ट तर्फे सत्कार करण्यात आला त्यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी वरुड तालुक्यातील तीर्थक्षेत्र विकासा संदर्भात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळांचे प्रस्ताव तयार करून तिर्थक्षेत्राच्या विकासा करीता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दिले.श्री क्षेत्र पाळा येथे या वर्षी पासून शारदीय नवरात्र अखंड ज्योत महोत्सव ७ आक्टोबर ते १४ आक्टोबर या कालावधीमध्ये मोठ्या उत्साहात सादर करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.

७ अक्टोबरला महालक्ष्मी मातेची आरती, अभिषेक, होम हवन करून अखंड ज्योत पूजन शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धनजी देशमुख, आमदार देवेंद्र भुयार, शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे यांच्या हस्ते होणार असून महोत्सवाला सुरुवात होणार आहे. यामध्ये नवरात्रातील नवही दिवस एक कुटुंबाची ज्योत याप्रमाणे २०० कुटुंबांनी सहभाग नोंदविला असून धार्मिक कार्यक्रमासोबतच सामाजिक कार्यक्रम राबविण्याचे ठरविले असून नत्र तपासणी, आरोग्य तपासणी, चष्मा वाटप, तसेच नवरात्र उत्सवामध्ये विविध समाजपयोगी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

१३ आक्टोबर ला महालक्ष्मीची पालखीची श्री क्षेत्र पाळा गावामध्ये भव्य मिरवणूक काढून गावकऱ्यांच्या हस्ते पूजन करून १४ आक्टोबरला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या शारदीय नवरात्र अखंड ज्योत महोत्सव कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन श्री सच्चीतनंद बालयोगी राजेश्वर माऊली ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश पाटील, यांनी केले यावेळी कार्यक्रमाला जगतगुरु राजेश्वर माऊली, आमदार देवेंद्र भुयार, अध्यक्ष सुरेश पाटील, उपाध्यक्ष श्रीकृष्णदास महोरे, कोषाध्यक्ष विजय हाते, सचिव मंगेश गुडधे, सहसचिव प्रकाश घोरमाडे, विश्वस्त सुरेश दीक्षित, विश्वस्त शरद पुसलेकर, सरपंच अजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, उपाध्यक्ष रुपेश वाळके, विश्वास्थ संजय वरठी, राजेश घोडकी, ग्राम पंचायत सदस्य यांच्यासह पंचक्रोशीतील आदी मंडळी उपस्थित होती.