समाजसेवी नितिनभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली संकल्प बहुद्देशीय संस्थेतर्फे आयोजित “भव्य नोकरी महोत्सव रोजगार मेळावा” संपन्न..

29

🔸१० हजापेक्षा जास्त विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रामधून विविध विभागातून रोजगाराभिमुख कार्यक्रमासाठी झाले हजर…

🔹१८४४ विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांच्या विविध पदावर झाली निवड..

✒️राजू कलाने(अमरावती प्रतिनिधी)

अमरावती(दि.4ऑक्टोबर):-संकल्प बहुद्देशीय संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या”भव्य नोकरी महोत्सव रोजगार मेळावा” २ व ३ ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधिजयानिमित्त आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या सुरवातीपासूनच विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. परंतू समाजसेवी श्री.नितीनभाऊ यांच्या रचनात्मक नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आलेल्या मुलखात प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली नाही. या भव्य सोहळ्याला अनेक शहामधील विविध दिग्गज मान्यवरांनी भेट देऊन या उल्लेखनीय कार्यक्रमाची वाहवही केली. या रोजगाराभिमुख सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामधील विविध विभागामधून १० हजारापेक्षा जास्त संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.

यामधील १८४४ विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपनी, सहकारी-खाजगी बँका, ओद्योगिक क्षेत्रे, खाजगी उद्योगक्षेत्रात नागपूर, अमरावती,औरंगाबाद,हैदराबाद, इंदोर,पुणे इतर वेगवेगळ्या शहरांमध्ये त्यांच्या शिक्षणानुसार व अनुभवानुसार नियुक्ती करण्यात आली आहे.या कार्यक्रमाला श्री.नितीनभाऊ कदम हे कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत दोन दिवस आपले संपूर्ण कामे बाजूला सारून फक्त त्या विद्यार्थ्यांसाठी मुलाखतीच्या प्रांगणामध्ये हजर राहून विद्यार्थ्यांना अडचण किंवा भ्रमनिरास असल्यास मदत करत होते. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना अडचण न व्हावी व त्यांनां दळण वळणाची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली.

यापुढे संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी यापेक्षाही भव्य कार्यक्रम घेत राहू असे वक्तव्य आणि विश्वास यावेळी श्री.नितीनभाऊ यांनी दर्शविला असून विद्यार्थ्यानी हसतमुखाने मुलाखतीदेऊन निरोप घेतला.या दोन दिवसीय रोजगाराभिमुख सोहळ्यासाठी संकल्प बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री. नितीनभाऊ कदम, संस्थेचे सचिव पर्वेशदादा कदम, संस्थेचे कोषाध्यक्ष अक्षयदादा पाटील व इतर सदस्यांनी अथक परिश्रम घेतले..